Breaking News

भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या वेषभूशाकार भानू अथैय्या यांचे निधन दिर्घ आजाराने कुलाबा येथील घरी घेतला शेवटचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी

चित्रपटातील वेषभूशासाठी देशाला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिध्द वेशभूषाकार भानू अथैय्या यांचे गुरूवारी रात्रो कुलाबा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांचे वय ९१ होते.

१९८२ साली रिटर्ड अॅटेनब्युरो दिग्दर्शित आणि बेन किंग्जले यांनी भूमिका साकारलेल्या गांधी चित्रपटातील वेशभूषा अथैय्या यांनी केली होती. त्यांबद्दल त्यांना जॉन मेलो यांच्याबरोबर ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या नंतर भारतातील कोणत्याही वेशभूषा काराला ऑस्कर मिळविता आला नाही.

त्या मुळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांचे मूळ नाव भानूप्रिया राजेपक्षे असे होते. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता स्व. गुरूदत्त याच्या सीआयडी या चित्रपटापासून त्यांनी वेशभूषाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गुरूदत्तच्याच चौदहवी का चॉंद, प्यासा, साहिब बीबी और गुलाम आदी चित्रपटासाठी काम केले. त्यानंतर देव आनंद यांच्या गाजलेल्या गाईड या चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली असून अनेक नामवंत अभिनेते, नेत्यांनी सोशल मिडियातून त्यांना आदरांजली वाहीली.

“उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार”
 आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून वेशभूषाकार भानू अथय्या सदैव स्मरणात राहतील. जमिनीवर पाय असलेली पण तितक्याच उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार आपल्यातून निघून गेली आहे. कला क्षेत्राला विशेषतः चित्रपट सृष्टीला खुणावणारे ऑस्कर भानू अथय्या यांनी आपल्या वेशभूषाकाराच्या निपुणतेने खेचून आणले. मुळच्या कोल्हापूरच्या मराठी कुटुंबातून आलेल्या भानूजींनी चित्रपट सृष्टीत आपला असा दबदबा निर्माण केला. हिंदी चित्रपट सृष्टीतील शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी आपल्या वेशभूषाकाराच्या कामाची छाप उमटवली. आजही या चित्रपटातील त्यांची कामगिरी टवटवीत आणि नजरेत भरणारी अशी वाटते. गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा ऑस्कर पुरस्कार मिळूनही त्या अलिकडच्या चित्रपटांसाठी नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करत राहील्या. त्यांचा भारतीय संस्कृती आणि परंपरांचा कलाविष्कारांच्या अंगाने गाढा अभ्यास होता. उत्तूंग सर्जनशीलता असूनही जमिनीवर पाय असलेल्या त्या महान कलाकार होत्या. आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील.महान कलाकार भानू अथय्या यांना विनम्र श्रद्धांजली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 

Check Also

श्रद्धा कपूरने खरेदी केली ही महागडी गाडी , किंमत ऐकून बसेल धक्का श्रद्धाने खरेदी केली इतक्या कोटीची महागडी गाडी; होतोय शुभेच्छाच वर्षाव

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *