Breaking News

अधिक व्याजदराचे पर्सनल लोन घेताय?, आधी ‘हे’ पर्याय पहा या चार पर्यायांचा विचार करा

मुंबई: प्रतिनिधी

अचानक पैशाची गरज लागल्यावर आपण सहजपणे मिळणारे पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतो. अशावेळी पर्सनल लोनसाठी किती व्याज  द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. मात्र, महाग कर्ज घेण्यापेक्षा पैसे उभारायचे इतरही मार्ग आपण बघितले पाहिजेत. पर्सनल लोनला पर्याय ठरतील असे हे मार्ग आपण जाणून घेऊया.

सोने तारण कर्ज

यामध्ये सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज मिळते. गहाण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीवर कर्जाची रक्कम अवलंबून असते. आरबीआयच्या  नियमानुसार, दागिण्यांच्या किंमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. या कर्जासाठी चांगल्या क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नाही. या प्रक्रियेत खूपच कमी पेपर वर्क असते. त्यामुळे ५ मिनिटातही कर्ज मिळू शकते.

मुदत ठेवी

बँकांतील मुदत ठेवींवरही कर्जाची सुविधा मिळते. सरकारी बँका, खासगी बँका आणि एनबीएफसी यांच्याकडून मुदत ठेवींवर कर्ज मिळते.  मुदत ठेवीमध्ये असलेल्या रकमेच्या ९० टक्के कर्ज मिळू शकते.

ईपीएफ

पर्सनल लोनच्या तुलनेत हा पण एक चांगला पर्याय आहे. घर खरेदी करण्यासाठी आणि गृह कर्जाचा ईएमआय देण्यासाठी ईपीएफ खात्यामधील ९० टक्के रक्कम काढता येते. यासाठी तुम्ही ईपीएफओचे ३ वर्ष सदस्य असला पाहिजे. ईपीएफ खात्यातून स्वतःचे, बहीण, भाऊ किंवा मुलीचे शिक्षण, स्वतःचे किंवा मुलगा किंवा मुलीचे लग्न, उपचारासाठी, घर खरेदीसाठी किंवा घराचे कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेऊ शकता. हे कर्ज परतफेड करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत असते. कर्जाची परतफेड दर महिन्याला किंवा एकावेळी करू शकता.

प्रॉपर्टी

गृहकर्जावरही कर्ज घेण्याची सुविधा मिळते. याला टॉप अप कर्ज म्हणतात. समजा, तुम्ही ३० लाख रुपयांचं घर घेतलं तर तुम्हाला बँकेकडून ८० टक्के म्हणजे २४ लाख रुपये कर्ज मिळेल. त्यानंतर काही वर्षात तुमच्या घराची किमत वाढते. जर किंमत ५० लाख रुपयांवर गेली तर तुमची कर्ज घेण्याची पात्रताही वाढते. या घरावर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. जर तुम्ही गृहकर्जाची पूर्ण परतफेड केली तर तुम्हाला ते घर तारण ठेवूनही कर्ज मिळते.

पीपीएफ

कोणत्याही व्यक्तीला बँकेत पीपीएफ खातं उघडता येतं. गरज पडल्यावर पीपीएफमधून कर्जही घेता येते. पीपीएफच्या नियमानुसार, ज्या  आर्थिक वर्षात पीपीएफ खातं उघडलं आहे त्यानंतर तिसऱ्या आर्थिक वर्षापासून पाचव्या आर्थिक वर्षापर्यंत फॉर्म डी सह पासबुक देऊन कर्जासाठी अर्ज करता येतो. महाग पर्सनल लोनपेक्षा हा पर्याय चांगला आहे.

विमा

काही विमा कंपन्या जीवन विमा पॉलिसीवर कर्ज देतात. जर तुमच्या पॉलिसीवर कर्जाची सुविधा असेल तर विमा घेतलेल्या कंपनीकडून कर्ज मिळू शकते. मनी बॅक आणि युलिप योजनांवर कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. मात्र, युलिप पॉलिसी बँकेकडे गहाण ठेवून कर्ज मिळू शकते.  बहुतांश बँका जीवन विमा पॉलिसीवर कर्ज देतात.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *