Breaking News

पश्चिम महाराष्ट्रातील रॉबीनहूड वाटेगांवकर काळाच्या पडद्या आड ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

मुंबईः प्रतिनिधी

गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व्यक्तींकडून धनगर समाजासह मागासवर्गीय समाजावार अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू वाटेगांवकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी सांगलीत निधन झाले. त्‍यांच्या जीवनावर आधारित त्यांच्याच नावाने अर्थात बापू बिरू वाटेगांवकर या नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

बापू बिरु वाटेगावकर यांनी कृष्णा खोर्‍यात गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात आवाज उठविला होता. सुरुवातीला त्यांची डाकू म्हणून प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र बापूंकडून होत असलेल्या कामाची हळूहळू माहीती होवू लागल्यानंतर त्यांना पश्चिम महाराष्ट्रात रॉबीनहूड म्हणून ओळखले जावू लागले.

बापू बिरू गोरेगांवकरांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून सतत ३५ वर्षे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागू शकले नव्हते. बोरगांव, रेठरे, हरणाक्ष, मसुचीवडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. त्यांच्या नावाची दहशत इतकी होती की, वाळवा तालुक्यातल्या लेकींना त्यांच्या सासूरवाडीच्या मंडळीकडून अथवा इतर टग्या लोकांकडून त्रास देण्यात येत असेल तर तुमची तक्रार बापूकडे करणार असल्याचे नुसते सांगितले, तरी त्या लेकींच्या सासरची मंडळी किंवा त्रास देणारी मंडळी सूतासारखी सरळ होत असल्याची आठवण वाळवा तालुक्यातील अनेक नागरीक आजही सांगतात.

बापू बिरू वाटेगांवकरांचा अन्यायकारक गोष्टींना नेहमीच विरोध असे. त्यांच्या दहशतीचा वापर करून त्यांच्याच मुलाकडून खंडणी मागण्याचे काम सुरु केले. याची माहिती मिळताच बापू बिरूंनी स्वतःच्या मुलाला सुरुवातीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून स्वतःच्या हाताने संपविले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *