Breaking News

टायगरने ‘बागी २’साठी केलं मनाविरूद्ध काम श्रॉफची स्वत:हून कबुली

मुंबई : प्रतिनिधी

काही अभिनेते आपल्या शरीरयष्टी, स्टाईल आणि लुकबाबत कायम सजग असतात. वास्तवाप्रमाणेच एखाद्या सिनेमातील आपल्या लुकबाबतही ते कमालीचे चिकित्सक असतात. आजच्या पिढीतील अभिनेता टायगर श्रॅाफ याचंही नाव अशा अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. इतरांपेक्षा आपण कसं वेगळं दिसू याकडे टायगर कटाक्षाने लक्ष देत असतो. टायगरचा ‘बागी २’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘बागी’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘बागी २’साठी टायगरने मनाविरुद्ध काम केलं असून, त्याने स्वत:च तसं कबूलही केलं आहे.

निर्माते साजिद नाडियाडवालांच्या ‘बागी २’चं दिग्दर्शन अहमद खान यांनी केलं असून, हुसैन दलाल यांनी संवादलेखन केलं आहे. ‘बागी’मध्ये टायगरने श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती, तर ‘बागी २’मध्ये टायगरसोबत त्याची रियल लाईफ गर्लफ्रेंड दिशा पटानी आहे. असं असूनही या चित्रपटासाठी मनाविरुद्ध काम केल्याची खंत टायगरच्या मनात का आहे? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. टायगरने स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना टायगरचा एक नवीन लुक पाहायला मिळणार आहे. आजवरच्या सिनेमांमध्ये लांब केस असलेला टायगर प्रेक्षकांना दिसला होता, पण या सिनेमासाठी त्याचे केस लहान करण्यात आले आहेत. टागगरचं आपल्या केसांवर खूप प्रेम आहे. नाडियादवाला आणि अहमद खान यांनी जेव्हा ‘बागी २’साठी टायगरला केस कापावे लागतील असं सांगितलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. सुरुवातीला तो केस कापायला तयार नव्हता असं समजतं, पण भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तत्पर असलेल्या टायगरने अखेर आपल्या लांब केसांना कैची लावण्याची परवानगी देत मनाविरुद्ध काम केलं.

टायगरच्या केसांना वेगळा लुक देण्यासाठी हेअर ड्रेसर अमित आणि यशवंत यांनी खूप मेहनत घेतली आहे. एकदम केस न कापता या दोघांनी टायगरचे थोडे थोडे केस कापत वेगवेगळ्या लुकमध्ये त्याला चेक केलं. या दरम्यान टायगरच्या डोळ्यात पाणीही आलं, पण त्याने मनावर ताबा ठेवत केसांना कैची लावायची परवानगी दिली. ‘बागी २’मधील आपला नवीन लुक पाहून टायगर खूप खूश आहे. यासाठी टायगर आता साजिद नाडियादवाला आणि अहमद खान यांचे आभार मानतो. या दोघांनी समजावलं नसतं तर आपण कधीच या लुकमध्ये दिसलो नसतो हे दखील तो मान्य करतो. या चित्रपटात टायगर-दिशासोबत शिफुजी भारद्वाज, प्रतीक बब्बर, मनोज बाजपेयी, रणदीप हुड्डा, दिपक डोब्रियाल यांच्याही भूमिका आहेत. याखेरीज जॅकलीन फर्नांडीसने या चित्रपटात मोहिनीच्या रूपात ‘एक दोन तीन…’ या ‘तेजाब’ सिनेमातील तूफान गाजलेल्या रिक्रिएटेड गाण्यावर डान्स केला आहे.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *