Breaking News

घरबसल्या आरोग्य तंदरूस्तीचे आयुर्वेदीक १३ कलमी उपाय आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शेखर मगर यांच्या सूचना

१.अंघोळीला शक्यतो कोमट  किंवा गरम पाणी वापरावे  त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला अथवा कडुलिंबाचा पाला न मिळाल्यास  तुरटी टाकावी.

२.दर तासाला तुरटीच्या  पाण्याने हात धुवावेत.

३.  सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठमधाच्या काढ्याने गुळणा कराव्यात , ज्येष्ठमध उपलब्ध न झाल्यास गरम मिठाच्या पाण्याने गुळणा कराव्यात .म्हणजे घशातील  टॉन्सिल्स मधील  जंतु हे  फुफ्फुसांमध्ये उतरणार नाहीत.

४. आंबट तेलकट व तळलेले पदार्थ पूर्ण वर्ज करावेत. भाजीमध्ये देखील केवळ फोडणी पुरतेच दोन चमचे तेल वापरावे.

५.गोड पदार्थ किंवा साखर घालून केलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत.

६. आहार हा सात्विक आहार असावा.

७.या काळामध्ये शरीराला प्रोटिन्सची गरज भासणार आहे  त्यामुळे आहारात डाळींचा उपयोग करावा.

८ .दिवसभर आले टाकून उकळलेले कोमट पाणी सेवन करावे.

९.रात्री झोपताना हळद व गूळ टाकून कमीत कमी पंधरा मिनिटे उकळलेले दूध सेवन करावे.

१० .पुरेशी विश्रांती घ्यावी (प्रौढांनी  कमीत कमी ७ तास झोपावे ).

११. दररोज किमान अर्धा तास तरी कोवळ्या उन्हामध्ये  बसावे. गर्दीच्या जागी जाणे टाळावे.

१२ .ज्यांना सर्दीचा जुना त्रास असेल किंवा अॅलर्जी असेल अशा रुग्णांनी वैद्याच्या सल्ल्याने कंठकारी अवलेह, नागरमोथा, ज्येष्ठमध, त्रिकटू, वंशलोचन, पिंपळी, सितोपलादी चूर्ण आधी औषधांचे सेवन करावे.

१३ . सध्या वसंत ऋतू चालू आहे .सकाळी थोडीशी थंडी असते तर दुपारी कडक उन असते . अशावेळी शरीरामध्ये कफ दोषाचा प्रसर होत असतो. त्यामुळे सर्वांनी आयुर्वेदाने सांगितलेली ऋतुचर्या दिनचर्या यांचे कटाक्षाने पालन करावे.

डॉ.शेखर मगर-9892223808

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *