Breaking News

“औरंगाबाद नामकरणा” वरून मुख्यमंत्र्यांनी भाजपाला पकडले पेचात औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची अधिसूचना काढा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

मुंबई : प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून मागील काही दिवसांपासून भाजपा विरूध्द शिवसेना असा वाद रंगलेला असतानाच आता त्यात काँग्रेस, मनसे हे ही सामील झाले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या रणनीतीला सडतोड उत्तर देण्यासाठी औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना एका पत्राद्वारे केली.
याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *