Breaking News

औरंगाबादच्या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीत राष्ट्रध्वजाचा अपमान गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : प्रतिनिधी

देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंड्याला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना हा ध्वज त्या त्या भागात सर्वोच्चस्थानी फडकवावा अशी राज्यघटनेतच नियम आहे. मात्र   १५ ऑगस्ट२०२० रोजी येथील समर्थनगरातील “प्रल्हाद भवन”  या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीतवर सर्वात उंचीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज, तर त्याच्या खाली राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे ‘प्रीव्हेन्शन ऑफ इन्सल्टस टू नँशनाल ऑनर अँक्ट-१९७१ चे कलम २.२ (Viii) नुसार गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष बलराज दाभाडे यांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

राष्ट्रध्वज किती उंचीवर फडकन्यात यावा, त्याचा आकार काय असावा यांची स्पष्टता कायदयात आहे. तरीही जाणीवपूर्वक राष्ट्रध्वज कमी उंची वर फडकीवण्यात आला. लोकांना देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे स्वयंसेवक हे खरे देशभक्त नसून देश विरोधी कृती करणारे आहेत हे या पूर्वी ही दिसून आलेले आहे. कित्येक वर्षे नागपूर येथील रेशीमबागेतील आरएसएस कार्यालयात राष्ट्रध्वज फडकू दिला नव्हता अशी आठवणही त्यांनी यावेळी प्रशासनाला करून दिली.

तरी जिल्हाधिकाऱ्यांनी समर्थ नगर,  औरंगाबाद येथील प्रल्हाद भवन येथील राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी ३ दिवसात चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा भिम आर्मी संघटने तर्फे संपूर्ण राज्यात संविधानिक मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *