Breaking News

नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे हंगामी अध्यक्षांकडून जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील सत्तास्थापनेवर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकत राजकिय नाट्यावर तुर्तास पडदा पडला. त्यामुळे सांसदीय राजकारणातील पुढील कायमस्वरूपी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीतून भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.

यासंदर्भातची घोषणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात केली. त्यांची निवड झाल्याचे जाहीर करताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सन्मानपूर्वक अध्यक्षाच्या आसनापर्यंत नेत विराजमान केले.

त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षिय नेत्यांनी त्यांचे कौतुक करत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी सर्वोच्चस्थानी बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *