Breaking News

शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना देवभूमीतल्या राज्यपालांच्या प्रमाणपत्राचीच गरज: ऐका त्यांचा व्हिडिओ राज्यपाल कोश्यारींच्या मदतीला पुन्हा भाजपा धावली

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मंदिरे, देवळे उघण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राचा समाचार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत त्यांच्याच शब्दात उलट भाषेत उत्तर दिले. त्या उत्तराने राज्यपालांची ढासळत चाललेली प्रतिमा सावरण्यासाठी आता पुन्हा भाजपाच्या नेत्यांनी धाव घेतली. देवभूमीतून आलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंदूत्वाच्या प्रमाणपत्राचीच खरी गरज मुख्यमंत्री ठाकरे यांना असल्याचे सांगत स्व.हिंदूहृदयसम्राट भाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व विद्यमान शिवसेनेने सोडलेले असल्याची टीकाही त्यांनी केली.

जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमी पुजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते.. “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले…त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते.. एवढेच नाही..तर..स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही.. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

ऐका त्यांचा व्हिडिओ त्यांच्याच भाषेत…

Check Also

या चार सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या ओ.पी. गुप्ता नवे उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव

मुंबई : प्रतिनिधी दिवाळी झाल्यानंतर लगेच राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *