Breaking News

शिक्षणाचे इथे.. कसले “फेअर काय लवली?” भाजपा नेते आमदार अँड.आशिष शेलारांकडून सरकारवर प्रश्नांची सरबती

मुंबई : प्रतिनिधी
“सरासरी” सरकार आणि निर्णय चवली-पावली…शिक्षणाचे इथे.. कसले “फेअर काय लवली?” अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका केली.
त्यांनी म्हटले आहे की, CBSC च्या मुलांना “बेस्ट आँफ थ्री” नुसार गुण मिळणार आणि SSC बोर्डाच्या मुलांना “बेस्ट आँफ फाईव्ह” नुसार गुण? मग SSC बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडणार? SSC बोर्डाच्या मुलांवर “सरासरी सरकारमुळे” अन्याय होणार. एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार? शाळांनी शुल्कवाढ करु नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली?
या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार ? की संस्था चालकांचा फायदा करणार? अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय “जैसे थे” ठेवण्यास सरकार तयार नाही. गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणार? महाराष्ट्रात शिक्षणाचे एकुणच काय..?
तर पालकांना फी वाढीचा खिशाला झटका..
११ वी प्रवेशात SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फटका…
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार…
“सरासरी” सरकार आणि निर्णय चवली-पावली…
शिक्षणाचे इथे.. कसले फेअर काय लवली ?

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *