Breaking News

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती

मुंबई: प्रतिनिधी

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली.

कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वे ने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते.

तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत ही विनंती आमदार अॅड आशिष शेलार यांनी रेल्वे राज्य मंत्र्यांना केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *