Breaking News

आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!

मुंबई: प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी चढवला.

आमदार अॅड आशिष शेलार यांनी दुपारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेऊन पोलिसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी एकुण चार आरोप केले. त्यापैकी पहिला सरदार शहावल्ली हा मुंबईच्या ९३ च्या बाँम्ब मधील शिक्षापात्र आरोपी असून त्याच्याशी नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार झाले.

दुसरा महमद सलिम पटेल हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा ड्रायव्हर व फ्रंट मॅन, पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आणि अटक झालेला आरोपी यांच्या मार्फत व्यवहार करुन फायदा करुन दिला.

तिसरा आरोप

मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपीं जे टाडा खाली अटक झाले त्या आरोपींची जी जमीन सील होणार सरकार जमा होईल म्हणून त्यांना मदत करण्यासाठी त्यांची जमीन स्वतःकडे वळवली, घेतल्याचे दाखवली.

आणि चौथा आरोपींची जमीन कवडीमोल किंमतीने घेऊन त्यांचा फायदा केला.

यातील तीन आरोप नवाब मलिक यांनी कबूल केले आणि हसीना पारकर या विषयात बोलण्याची हिंम्मत नसल्याने त्याबद्दल मौन राखून तो आरोप मौन धरुन कबूल केला.

म्हणजे नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत म्हणजे.. कबूल.. कबूल.. कबूल.. असा कबुलीनामा होता, अशी टीकाही त्यांनी केली.

नवाब मलिक यांनी या आरोपांच्या समर्थ जे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात की त्या जागेत आमची दुकाने होती त्यासह संपूर्ण कंम्पाऊंची मालकी मिळवली. तेही ३० लाख ठरवून २० लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली. मुंबईततील हे कसले “नवाबी भाडेकरु ?”  ज्यांना सरकारी दरापेक्षा कमी दरात जागेची मालकी मालकाने दिली. मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा, अशी उपरोधिक मागणी ही त्यांनी केली.

मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आज सुध्दा सरकार रेडीरेकनरच्या २५% रक्कम जमा करुन घेते मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली असा सवाल करीत ते म्हणाले की, यांनी या व्यवहारातील सांगितल्या जाणाऱ्या हास्यास्पद बाबी समोर आणल्या.

या व्यवहारात सरदार शहावल्ली याचे वडील वॉचमेन असल्याने त्यांनी आपले नाव जागेला चढवले म्हणून त्याला पैसै दिले हे मग हा मुंबईतील वॉचमनला नवा नवाबी धंदा सांगताय का? असा सवाल केला. आमदार शेलार यांनी नवाब मलिक सांगत असलेल्या नवाबी दर, नवाबी धंदे, नवाबी व्यवहार, नवाबी भाडेकरु, नवाबी मालक याची खिल्ली उडवली. तसेच हा विषय एवढा सरळ नसून मुंबईला १९९३ ला बाँम्ब स्फोट झाले आणि त्यातील दोषी आरोपींना मदत करण्यासाठी २००५ ला हे व्यवहार झालेले असल्याने हा विषय गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी अशी मागणी केली. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाद्ये, प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय उपाध्याय भाजपा नगरसेवक. संदिप लेले आदी उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *