Breaking News

हा तर तालिबानी कारभार भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

दहिदंडी पारंपरिक पद्धतीने सुध्दा साजरी करणाऱ्यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणाऱ्या ठाकरे सरकारलाचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरु आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी सरकारला सवाल करत टीका केली.

आज दहिदंडी उत्सव पारंपरिक पध्दतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करण्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता त्यावर काल रात्री पासून पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाहीचा वापर करण्यात आला. कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आज मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांना अशाच पध्दतीने दडपशाहीचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो. गणेशोत्सव काळात पण असाच पोलिस बळाचा वापर केलात तर आज आम्ही शांततेने कायद्याचा सन्मान केला. पण गणेशोत्सवात अशी दडपशाही सहन करणार नाही. नियम पाळून शांतपणे गणेशोत्सव साजरा करु द्या अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, गर्दीची कारणे सांगून उत्सवावर बंदी आणत आहात मग, पब, डिस्को, बार कसे सुरु आहेत? जे “वाटाघाटी” करतात त्यांना परवानगी आणि उत्सवांवर कायद्याने बंदी? हा कसला कारभार? असा टोलाही त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकान्वये राज्य सरकारला लगावला.

दहिहंडी उत्सवावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी भाजपा आणि मनसेने मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी विना परवानगी दहि हंडी उस्तव साजरा करत सरकारवर टीका केली.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *