Breaking News

ठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
कु-हेतू, वैयक्तिक सुडबुध्दीचे राजकारण महाराष्ट्रात गेल्यावर्षभर सुरु आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्का मोर्तबच केले. ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला.
आता कंगणा रनौत यांना नुकसान भरपाई द्यावी लागली तर…? कंगणा यांच्या विरोधात उभ्या केलेल्या वकिलांवर खर्च झालेले पालिकेचे सुमारे १ कोटी आणि कंगणा यांनी दावा केलेले २ कोटी अशी जी काही रक्कम व्हॅल्यूअर ठरवतील ती कोट्यवधीची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी अशी मागणी केली.
सुडबुध्दीने कुणालाही अटक करायची, मारहाण करायची, घरावर बुलडोझर चालवायचे.. आणि बोट मात्र दुसऱ्याकडे दाखवायचे अशी खोचक टीका त्यांनी केली.

Check Also

विधानसभाध्यक्ष पदाकरिता या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची नावे आघाडीवर

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ठिकाणी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *