Breaking News

पीएमसीसह या २१ बँकांच्या खातेदारांना मिळणार ५ लाख रुपये २९ नोव्हेंबर पर्यंत मिळणार पैसे

मुंबई : प्रतिनिधी

२१ बुडीत बँकांच्या ग्राहकांना या वर्षी डिसेंबरपर्यंत पैसे मिळू शकतील. ठेवींवर सरकारच्या असलेल्या हमीखाली हे पैसे खातेदारांना मिळतील. या अंतर्गत खातेधारकांना जास्तीत

जास्त ५ लाख रुपये मिळतील. गेल्या महिन्यात संसदेने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२१ मंजूर केले. यानुसार, आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या ९० दिवसांच्या आत खातेधारकांना ५ लाख रुपये मिळणार आहेत.

बँकांमध्ये ज्या काही ठेवी ठेवल्या जातात, त्या विम्याच्या कक्षेत येतात. याचा अर्थ असा की जर बँक बुडली किंवा दिवाळखोर झाली तर खातेदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपये    मिळतील. अलीकडच्या काळात, पीएमसीसह एकूण २१ सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. यामुळे या बँकांच्या सर्व खातेधारकांना या विम्याअंतर्गत पैसे मिळण्याचा हक्क राहणार आहे.

बँकांमधील ठेवींचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केला जातो. डीआयसीजीसीने म्हटले आहे की, बँकेच्या विमा उतरवलेल्या ठेवींच्या ठेवीदारांना पैसे देण्याची योजना आहे. हे पैसे डिसेंबरपर्यंत मिळू शकतात. डीआयसीजीसीने म्हटले आहे की एकूण २१ बँका त्याच्या कक्षेत आहेत. पीएमसी ही सर्वात मोठी बँक आहे. काही आवश्यक सूचना त्या बँकांना दिल्या आहेत. बँकांना ४५ दिवसांच्या आत आपले दावे सादर करावे लागतील. त्यानंतर या दाव्यांची छाननी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर पुढील ४५ दिवसात बँकेला पैसे दिले जातील आणि ते पैसे खातेदारांना दिले जातील. याचा अर्थ २९ नोव्हेंबरपर्यंत बँकेच्या दाव्यांची छाननी केली जाईल.

DICGC सुधारणा विधेयक ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेत मंजूर झाले. यामध्ये बँक ठेवींवरील विमाधारक हमी ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे पैसे रिझर्व्ह बँकेच्या स्थगिती कालावधीनंतर ९० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजेत. पूर्वी विम्याची रक्कम एक लाख रुपये असायची.

या २१ बँकाच्या ठेवीदारांना मिळेल भरपाई

१) अदूर को ऑप. अर्बन बँक, केरळ

२) बिदर महिला अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र

३) सिटी को ऑप बँक , महाराष्ट्र

४) हिंदू को ऑप बँक, पंजाब

५) कपोल को ऑप बँक , महाराष्ट्र

६) मराठा सहकारी बँक , महाराष्ट्र

७) मिलाथ को ऑप बँक , कर्नाटक

८) नीड्स ऑफ लाईफ को ऑप बँक, महाराष्ट्र

९) पदमश्री डॉ. विठ्ठल राव विखे पाटील बँक , महाराष्ट्र

१०) पीपल्स को ऑप बँक कानपुर उत्तरप्रदेश

११) पंजाब अँड महाराष्ट्र को ऑप बँक (पीएमसी बँक) महाराष्ट्र

१२) रुपी को ऑप बँक , महाराष्ट्र

१३) श्री आनंद को ऑप बँक , महाराष्ट्र

१४) सीकर अर्बन को ऑप बँक, राजस्थान

१५) श्री गुरुराघवेंद्र सहकारी बँक कर्नाटक

१६) दि मुधोळ को ऑप बँक कर्नाटक

१७) मंथा अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र

१८) सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक , महाराष्ट्र

१९) इंडिपेन्डन्स को ऑप बँक नाशिक महाराष्ट्र

२०) डेक्कन अर्बन को ऑप बँक , कर्नाटक

२१) गृह को ऑप बँक मध्य प्रदेश

 

Check Also

फेस्टिवल ऑफर : बँक ऑफ इंडियाकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात प्रक्रिया शुल्कही नाही

मुंबईः प्रतिनिधी सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *