Breaking News

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर सैलचा गौप्यस्फोट: शाहरूखकडे मागितली खंडणी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्राद्वारे केला गौप्यस्फोट-जीवाला धोका असल्याने दिली कबुली

मुंबई : प्रतिनिधी

आर्यन खान ड्रग्जप्रकरणात आणखी एका नव्या ट्विस्टची आज भर पडली असून या प्रकरणातील पंच के.पी.गोसावी याचा बॉ़डीगार्ड आणि १८ व्या नंबरचा पंच प्रभाकर सैल यांने आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रूपये मागितले गेले पण १८ कोटीवर ही डील फायनल झाल्याचे सांगत त्यातील ८ कोटी रूपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना दिले जाणार होते असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रभाकर सैल यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नोटरीवर प्रतिज्ञापत्रक देत केला. तसेच आपल्या जीवाला वानखेडे यांच्यापासून धोका असल्याची भीतीही व्यक्त केली.

प्रभाकर सैल याच्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणात आता वेगळीच ट्विस्ट निर्माण झाली आहे.

सैल यांच्या प्रसारीत झालेल्या व्हिडिओतील माहितीनुसार तो त्याच्या घरातील वैयक्तीक कारणामुळे तो आर्यन खान प्रकरणातील पंच के.पी. गोसावी याच्याकडे ठाणे येथे रहायला गेला. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ठाणे येथून गोसावी आणि सैल हे वाशी येथील सेक्टर-१६ येथे रहावयास गेले. त्यानंतर गोसावी हा गुजरातला गेला. तेथून परतताना गोसावी याने सैल याला फोन केला. त्यानंतर त्यास सीएसटी येथे बोलावले. तेथून त्याला व्हॉट्सअॅपद्वारे लोकेशन पाठवित एनसीबी कार्यालयाजवळ बोलावले. तेथून ते दिवसभर सोबत राहीले.

त्यानंतर संध्याकाळी रेडसाठी सोबत चैना गेट येथे नेण्यात आले. मात्र त्याला सुरुवातीला गेटवरच थांवविण्यात आले.

त्यानंतर रात्री उशीरा त्याच्या फोनवर काही फोटो पाठवून यातील काही जणांना ओळखतोस का अशी विचारणा केली. त्यावर त्यातील एका फोटोतील मुलाला ओळखल्याचे त्यांने सांगत तो आर्यन खान असल्याचे गोसावी यास सांगितले. त्यानंतर गोसावी हा पुन्हा बाहेर आला. त्याने कपडे बदलले आणि गोसावी सोबत आत गेल्याचे त्याने सांगितले. तेथे आत गेल्यानंतर आर्यन खान याला एका केबिनमध्ये बसविण्यात आले. तेथून ते काही वेळानंतर त्या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले.

काही कालावधीनंतर गोसावी सोबत आपण लोअर परेल येथे गेलो. तेथे पोहोचल्यानंतर त्या गाडीच्या मागे दुसरी एक गाडी येवून उभी राहीली. त्यामागे निळ्या रंगाची मर्सिडेज बेंज उभी राहीली. त्यात शाहरूख खान याची मॅनेजर होती. त्या गाडीत गोसावी हे ही जावून बसले. त्यानंतर त्यांच्यात मिटींग झाली. त्या मिटींगमध्ये काय झाले हे मला कळाले नाही. मात्र त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर गाडीमध्ये गोसावी हा कोणाशी तरी बोलत होता. त्यावेळी २५ कोटी सोडून द्या १८ कोटीला डील करा असे सांगत त्यातले ८ कोटी रूपये समीर वानखेडे यांना जाणार असून राहीलेले १० कोटी आपल्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत असे सांगत असल्याचे ऐकल्याचे सैल याने सांगितले.

त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर गोसावी याने आपल्या रूममधून मला फोन केला आणि आता लगेच तु मुंबई सेंट्रल येथे जा एक गाडी येईल तुला बॅग देईल ती घेवून येण्यास सांगितले. त्यानुसार मी ताडदेव येथे गेलो तिथे गेल्यावर एका गाडी आली त्या गाडीतून एकाने मला एक बॅग दिली. ती घेवून मी पुन्हा घरी आलो. आल्यानंतर गोसावी याने सगळे कपडे भरले आणि तो त्याच्या गाडीने पुन्हा गेला. नंतर एक-दोन दिवसानंतर त्याने पुन्हा मला फोन करत मला वाशीतील इनॉरबीट मॉल येथे बोलावले. तेथे त्याने मला त्याच्या गाडीत बसविले आणि एक पिशवी दिली. ती पिशवी घेवून मला चर्चगेट येथे जाण्यास सांगितले. तसेचे ही पिशवी डिसूझाला देण्यास सांगितले. तसेच डिसूझा तुला फओन करेल असे सांगितले. त्यानुसार मी चर्चगेटला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर डिसूझाने मला ओबेरॉय हॉटेल येथे मला बोलाविले. तिथे गेल्यावर त्याच्याकडे ती पिशवी दिली. त्यानंतर त्या पैशातील सर्व पैसे त्याने मोजले त्यावर तो हे तर फक्त ३८ लाख असल्याचे सांगितले. त्यावर मी गोसावी ला फोन करा मला माहित नाही असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांमध्ये फोनवरून बोलणे झाले. त्यावेळी गोसावी याने दोन दिवसात बाकिचे अॅडजस्ट करतो असे सांगितले. त्यानंतर मी तेथून निघाल्याचे सांगितले.

त्यानंतर पुन्हा गोसावी हा गायब झाल्याने माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ही व्हिडिओद्वारे ही माहिती प्रसारीत करत असल्याचे त्याने स्पष्ट करत मला समीर वानखेडे यांच्यापासून धोका असल्याचे स्पष्ट केले.

प्रभाकर सैल याचे नोटरीद्वारे दिलेले हेच ते प्रतिज्ञापत्र:-

 

 

 

Check Also

अनिल देशमुख आणखी १४ दिवस तुरूंगात विशेष न्यायालयाने सुणावली न्यायालयीन कोठडी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या ५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *