Breaking News

आर्यनसह तिघांना अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूरः पण सुटका उद्या अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा हे ही बाहेर येणार

मुंबईः प्रतिनिधी
कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी अखेर आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या संपूर्ण निकालपत्र तयार झाल्यानंतर या तिघांना तुरुंगातून सोडण्यात येणार असून शक्य झाल्यास आज रात्रीच किंवा उद्या दिवसभरात या तिघांना सोडण्यात येईल असे सांगण्यात येईल.
यासंदर्भात आर्यन खान याचे वकील मुकूल रोहितगी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चट या तिघांना जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला असून निकालपत्र पूर्ण तयार झाल्यानंतर या तिघांना तुरुंगातून सोडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिघांसाठी ज्या अटी आणि नियम हे उद्या सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी जामीन अर्जावरील सुणावनी नितीन सांबरे या एकसदस्यीय खंडपीठासमोर सुणावनी झाली.
या सुणावनी वेळी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी युक्तीवाद करताना म्हणाले की, हा खटला ड्रग्जचे सेवन केल्याप्रकरणीचा नसून तो बाळगल्याप्रकरणाचा आहे. तसेच तो जाणतेपणी बाळगून तो सेवन करण्याविषयीचा आहे. त्यामुळे एनडीपीसी अॅक्ट मधील २९ अन्वये कट रचल्यासंदर्भातील आहे. तसेच या कलमाखाली आरोपीकडून तो व्यापार करण्याइतपत साहित्य सापडल्या प्रकरणीचा आहे. तसेच आर्यन खान याच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून आढळून आलेले आहे. याशिवाय हा योगायोग नाही की संपूर्ण क्रुजवर फक्त ८ जण ड्रग्ज आणि त्याच्या अनेक व्हराईटी आढळून येणे.
त्याचबरोबर ड्रग्ज जप्त करण्याताना हा व्यावसायिक वापराच्या अनुषंगानेच हा माल मिळाल्याचा आरोप करत चॅटमधील माहितीनुसार अरबाज खानखडे असलेल्या ड्रग्जचा वापर ते क्रुजवर गेल्यानंतर त्याचे सेवन करणार असल्याचा अर्थ ध्वनित होत असल्याचा दावा त्यांनी न्यायालयासमोर केला.
त्यानंतर आर्यन खान याचे वकील मुकुल रोहितगी म्हणाले की, अशा कोणत्याही पध्दतीचे कट-कारस्थान असल्याचे कोठेही किंवा ड्रग्जची विक्री करण्यासाठी कोणाबरोबर बैठक करण्याची कोणतीही शक्यता नाही. त्याबरोबर ड्रग्ज विक्रीच्या अनुषंगाने कोणाबरोबर मिटींग करण्याची चर्चाही झाली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत एखाद्या हॉटेलमध्ये अनेक जण असतील आणि तेथील सर्वजण स्मोक करत असतील तर त्यास सर्वांनी मिळून केलेला कट म्हणायचा असा प्रतिप्रश्न केला.
याशिवाय मी फक्त अरबाझ मर्चंटला ओळखतो, बाकीच्यांना ओळखत नसल्याचे अशीलाने स्पष्ट केल्याने कोणासोबत तरी मिटींग करण्याचे कारस्थान असणे म्हणणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *