Breaking News

अखेर अरविंद सावंतांच्या रूपाने शिवसेना एनडीएतून बाहेर भाजपाआधीच शिवसेनेकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा

नवी दिल्लीः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आज राजीनामा दिला.
विशेष म्हणजे भाजपाने युतीसंदर्भात भूमिका जाहीर करण्यासाठी शिवसेनेला संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वीच शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीपदाचा राजीनामा देत युती तोडल्याचे अप्रत्यक्षरित्या भाजपाला सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्यावेळी भाजपाने शिवसेनेला दिलेले आश्वासन पाळले नाही. तसेच मुख्यमंत्री पद देण्यासंदर्भातचे वचनही पाळले नाही. त्यामुळे भाजपाच्या विश्वासहार्तेला तडे गेल्याने आपण शिवसेनेचा मंत्री म्हणून राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केल्याचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *