Breaking News

फडणवीस म्हणाले, सचिन वाझे यांच्या अटकेमुळे अर्ध्ये सत्य बाहेर आणखीही बरेच बाहेर येईल

पुणे : प्रतिनिधी

अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेमुळे सध्या अर्ध्ये सत्य बाहेर आले असून आणखी बरेच काही तपासात उघड होईल असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी सचिन वाझे यांच्या अटकप्रकरणी प्रतिक्रिया देत होते.

स्फोटकप्रकरणी मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणात काही तरी काळंबेरं असल्याचे दिसून आले. याप्रकरणातील अनेक गोष्टींचा शोध आपण घेतलेला आहे. तसेच याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचे अनेक गोष्टींवरून आढळून येत आहे. याप्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार असून या सर्व गोष्टी एका विशिष्ट व्यक्तींकरीता केल्याचे दिसून येत असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले.

सचिन वाझे यांना मुंबई उच्च न्यायालयाने निलंबित केले होते. आमचं सरकार होतं त्यावेळी त्यांच्याबाबतची माहिती आपण घेतली होती. परंतु त्यावेळी न्यायालयाने त्यांना निलंबित आलेलं असल्याने त्यांना पुन्हा रूजू करून घेता येणार नसल्याचा अभिप्राय मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत विचार केला नाही. मात्र त्यानंतर या नव्या आलेल्या सरकारने त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचे सांगत वाझेंना रूजू करून घेतल्यानंतर तेथील क्राईमच्या पीआयला हटवून त्या सर्व केसेस त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निलंबनाच्या काळात सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पक्षाचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे ते एकप्रकारे शिवसेनेचे पूर्णवेळ कार्यकर्त्ये म्हणूनच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसुख हिरेन बाबत त्यांचा सहभाग पूर्णपणे दिसत असतानाही राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री त्यांना पाठिशी घालत होते. अशआ प्रकारे मुळे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *