मुंबई: प्रतिनिधी
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे अर्नव गोस्वामी यांना आज अटक झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी बचावासाठी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
आत्महत्या प्रकरणात आरोपीच्या बाजुने भाजपाचे केंद्रीय मंत्री ट्वीट करत असतील तर या देशाने मान्य करायचे का भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत असे ट्वीट करुन नवाब मलिक यांनी भाजपाला चांगलेच पेचात पकडले आहे.
