Breaking News

अर्णव गोस्वामीवरील कारवाईने सत्ताधारी-विरोधक आमने सामने भाजपाचे ठिकठिकाणी मोर्चे

मुंबईः प्रतिनिधी
रिपब्लिक टि.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांना आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज सकाळी अटक करण्यात आली. या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र राज्यात पाह्यला मिळाले.
गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसच्या मदतीने आणीबाणी आणत असल्याचा आरोप शिवसेनेवर करत महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करण्यात आला. या अटकेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पत्रकारावर कारवाई करण्यात आलेल्या घटनेमुळे आणीबाणीचे दिवस आठवत असल्याचे मत व्यक्त केले.
तर शिवसेना नेते तथा मंत्री अनिल परब यांनी भाजपाचा पोपट पिंजऱ्यात असल्याची उपरोधिक टीका केली. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही पोपट पाळत नाही. आम्ही जे राजकारण करतो ते स्वबळावर राजकारण करतो दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत असल्याचे प्रतित्तुर दिले. गोस्वामीच्या अटकेच्या निदर्शनार्थ भाजपाकडून ठिकठिकाणी धरणे, मोर्चा आणि निदर्शने करण्यात आली.
याप्रश्नी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, अर्णव गोस्वामीवरील कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. तसेच संपूर्ण पोलिसांनी केलेली कारवाई आहे.
दरम्यान, गोस्वामीला अटक करण्यासाठी पोलिस भल्या सकाळी अर्णवच्या घरी पोहोचले. मात्र त्याने सुरुवातीला एक तास घराचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर उघडल्यानंतर पोलिसांबरोबर स्वतःच्या अटकेच्या अनुषशंगाने हुज्जत घातली. मात्र अखेर पोलिसांनी त्यास अटक करत पनवेल येथील न्यायालयात हजर केले. त्यावर संध्याकाळी उशीरापर्यत सुनावणी सुरु होती.

Check Also

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *