Breaking News

गुगलगुरू… ते रिकामटेकडेपण संवेदनशील कलावंत, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची नेटकऱ्यांसाठी खास कथा

रवी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता खूप वाचन करून खूप हुशार आहे’, असा समज सर्व गावकऱ्यांमध्ये पसरला होता. तो प्रत्येक गोष्टीच्या खोलात शिरून त्याचा त्याच्या मनाने अर्थ आणि सत्यता शोधून काढण्यात मग्न असायचा. गावात फार कोणाशी बोलत नसे, करण तो बाकिना त्याच्या बरोबरचा समजत नव्हता, त्याच्या या एकाकी स्वभावामुळे त्याच्या बरोबरचे सगळी गावातली मुलं त्याला वेडा समजत होते. त्याने त्याच्या अभ्यासाच्या बळावर गावात स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग सुरू केले. त्याच्या शिकवणी वर्गात प्रकाशने प्रवेश घेतला. प्रकाशला नेहमी खूप सारे प्रश्न पडतात म्हणून त्याच्या घरच्यांना वाटलं तो स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू शकतो आणि प्रकाशलाही त्यामुळे आत्मविश्वास आला. एकदा बस स्टॉप वर प्रकाश ने चालू घडामोडी च पुस्तक घेतलं आणि त्यावर तो स्वतःचे नाव लिहीत होता त्याच्या बाजूला बसलेला व्यक्ती त्याला नाव लिहीत असताना बघून बोलला, ‘स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकावर नाव लिहिण्यापेक्षा यादीत नाव लिहिता आलं पाहिजे!’ प्रकाश एकदम चमकला ती व्यक्ती म्हणजे रवी. रवीच्या त्या वाक्यामुळे तो दुसऱ्याच तो भारावून गेला त्याने रवीची चौकशी केली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या शिकवणी वर्गात प्रवेश घेतला.

प्रकाशने रवीला गुरू आणि रवीने प्रकाश ला विद्यार्थी (चेला) मानले. दोघांचाही आता एवढा अभ्यास झाला की त्यांना आता कोणाचेही मार्गदर्शन घेणे कमीपणाचे वाटत होते. काळाबरोबरच विज्ञानाची प्रगती झाली आता साधा ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल जाऊन आता मल्टीमीडिया, अँण्ड्राईड आणि इंटरनेटची सुविधा असलेले मोबाईल दोघांच्याही हातात आले. इंटरनेटचा वापर सर्वसामान्य झाल्यामुळे आता कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हे दोघेही नेटवर शोधत होते. या त्यांच्या अति नेट वापरामुळे किंवा अति मोबाईल वापरामुळे त्यांचा आणि पुस्तकांचा संबंध जवळजवळ संपुष्टात आला (तसेही पुस्तकाचे प्रास्ताविक हेच त्यांचे पुस्तक वाचन होते).

त्यामुळे इंटरनेटची माहिती हीच खरी माहिती असा समज दोघांच्या मनात रूढ झाला. प्रश्नाची उत्तर मिळवताना रवी  गुगलचा आधार घ्यायचा आणि तीच माहिती प्रकाशला तो ऐकवायचा. प्रकाशही बऱ्याच वेळा गुगल वरचे प्रश्न रवीला विचाराचा रवीच्या वाचनात नसलेले काही प्रश्न ऐकून रवी आश्चर्यचकित व्हायचा. ‘मोबाईल मुळे जग आपल्या हातात आहे’ याची शाश्वती रवीला आणि प्रकाश या दोघांनाही आली. फेसबुकवर रवी आणि प्रकाश सातत्याने लेख लिहायला लागले. गावच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात या दोघांचा लेखक म्हणून ज्या दिवशी उल्लेख झाला, त्यादिवसापासून यांच्या फेसबुक लेखनाची संख्या कमालीची वाढली. मराठी भाषा दिनाच्या औचित्याने रवीने भला मोठा लेख लिहिला लेखामध्ये बऱ्याच चुका होत्या, कारण रवी फक्त बी. ए. पास होता आणि बी. ए. मध्ये त्याला मराठी वाड:मय हा विषय अभ्यासाला होता. आपण मराठी वाड:मयचा अभ्यास केला याचा अभिमान होता (भले त्याला या विषयात शंभर पैकी चाळीस म्हणजे बाकी विषयापेक्षा जास्त होते.).

त्याच्या मराठी भाषा विशेष लेखाला लेखाला हजारो लाईक आणि पाचशे ते सहाशे कमेंट होत्या. कमेंटमध्ये रवीला शिकविणाऱ्या प्राध्यापकांची ही कमेंट होती. ज्यामध्ये रवीला त्याच्या चुका त्या प्राध्यापकाने निदर्शनात आणून दिल्या. त्यात कमेंटला प्रत्युत्तर म्हणून प्रकाशने रवीच्या लेखाच्या बरोबरीची एक कमेंट केली. आणि बाकीच्या कमेंट ह्या रवी किती हुशार आहे किंवा रवीला प्रोत्साहन आणि त्याच्या हुशारीची तारीफ केलेल्या होत्या. आता रवी आणि प्रकाश दोघांनी मिळून “लिखाण एक चळवळ” नावाने फेसबुकवर पेज सुरू केले आणि आळीपाळीने त्यावर लेखांचा त्यांच्या मते स्तंभलेखनाचा भडिमार करत होते.

अँग्री यंग मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चनच्या एका चित्रपटाच्या संवादावर रवीने आपल्या फेसबुक पेजच्या आधारे आक्षेप नोंदविला आणि फेसबुक वापरणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाही त्याने टॅग केला. त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी, ‘सोशल मीडियाच्या सहारे आपण कोणालाही सहज उपलब्ध होत आहोत म्हणून सोशल मीडिया वापरणं बंद करत आहे’, अशी पोस्ट टाकून त्यांनी सोशल मीडिया वापरणं बंद केलं अशी बातमी आली. आपण घेतलेल्या अक्षेपामुळेच अमिताभ बच्चन ने सोशल मीडिया वापरणे बंद केलं असं त्याला वाटलं, पण खरतर अमिताभ बच्चन ने सोशल मीडिया वापर बंद करणे आणि रवीच्या त्या लेखाचा काहीही संबंध नव्हता. खरतर अमिताभ बच्चन ने तो लेख पाहिला सुद्धा नव्हता कारण अमिताभ बच्चनचे अकाउंट सांभाळण्यासाठी त्यांनी लोक अपॉईंट केले होते. त्यादिवशी प्रकाश एक किलो पेढे घेऊन आला म्हणाला, ‘दादा तुमच्या लेखनाची ताकद काय आहे ती आज मला कळली’ असं म्हणत प्रकाशने रवीच्या पायावर अक्षरशः डोकं टेकलं आणि रवी कृतकृत्य झाला, त्याचे डोळे पाणावले, ‘आपल्या लेखनी मध्ये खरंच एवढी ताकत आहे?’  या विचाराने तो भारावून गेला. आणि त्याने ठरवलं की फेसबुकवर सातत्याने लिहीत सुटायचं आणि तो तसंच करत राहीला, लिखाणासाठी कारण शोधत तो चित्रपट पाहतांना, सिरिअल पाहताना, मनोरंजसाठी नव्हे तर त्यावर आपल्याला लिहायचं आहे म्हणून कागद आणि पेन घेऊन बसू लागला. सरकारच्या एखाद्या कायद्याला विरोध करण्यांविषयी तो पान पान लिहायला लागला, प्रत्यक्षात तो कायदा काय आहे हे सुद्धा त्याला नाहीत नसायचं तो पेपर च्या hedline वरून ठरवायला लागला की नेमकं या बातमी मध्ये काय आहे. हल्ली घरी बायकोसोबत भांडण झाल्यावरही तो आपला राग उद्रेक फेसबुक वर लिहायला लागला. ग्रामपंचयातीच्या कामाचा लेखाजोखा, ग्रामपंचायत कामच करत नाही असाही एक तक्रारीचा लेख लिहिला. त्यावर ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आणि सदस्यांनी त्याला खूप ऐकविले, या कारणावास्तवात सगळी काम झाली होती, बरेच दिवस रवीला लिहायला विषय नव्हता त्यामुळे त्याने ग्रामपंचायतला धारेवर धरू म्हणून हा लेख लिहिला. पण ग्रामपंचायतने ग्रामसभेत सगळा लेखा जोखा गावसमोर दाखवून रवीचा हशा उडविला. आता गावातले तेच लोक जे रवीला हुशार म्हणत होते, ते चिडवायला लागले. आपण नेटच्या विळख्यात एवढे हरवून गेलोय की आपल्याला खऱ्याची पारख करणे आपल्याला कमीपणा वाटायला लागला आहे?

जर असेल तर काही दिवस आपण ते वापरणं बंद केलं पाहिजे. आता रवी शांत आहे. मागच्याच महिन्यात कुठे तरी तलाठी म्हणून नोकरीला लागला, भेटला होता. तेव्हाही त्याच्या हातात मल्टिमेडिया मोबाईल होता मात्र तो फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम अश्या सोशल मीडियाच्या एकाही माध्यमावर नाही.

 

लेखक-अंकुर विठ्ठलराव वाढवे

Check Also

बी पॉजिटीव्ह अमित तात्या… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा

अमित तात्या लहानपणीच मुंबईला पळून गेला, साधारण दुसरीत असताना किऱ्याचं डोकं फोडलं भळाभळा येणार रक्त बघून मास्तर, किऱ्याचा बेवडा बाप आणि त्याही पेक्षा अस्सल बेवडा आपला बाप आपल्याला जिवंत ठेवणार नाही, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *