Breaking News

याचिका न्यायालयात मात्र युक्तीवाद रंगला विधानसभेत फडणवीस विरूध्द अनिल परब रंगला सामना

मुंबईः विशेष प्रतिनिधी

प्रस्तावित आरे तील कारशेड कांजूर मार्ग येथे स्थलांतरीत करण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच विरोध केला. तरीही राज्य सरकारने कारशेड तिकडेच हलविले. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम चार वर्षे पुढे जाणार असल्याची बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी सभागृहात उपस्थित केला.

त्यास सुरुवातीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हरकत घेत याविषयीची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले.

त्यावर फडणवीसांनी म्हणाले की, शिंदे मी तुम्हाला अधिकची माहिती देतोय, सदरचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित नाही. त्याविषयीची याचिका न्यायालयात दाखलच करून घेतली नाही. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे.

यावर सांसदिय कार्यमंत्री अनिल परब यांनी तुम्ही ही वकिल आहात मी ही वकील आहे. न्यायालयात सदरची याचिका न्यायालयात सादर केलेली आहे. त्यावर उद्या युक्तीवाद होणार आहे. त्यावर निकाल झाल्यानंतर आपण खुशाल बोला असे स्पष्ट केले.

परब यांचे उत्तर न पटल्याने पुन्हा फडणवीस यांनी तुम्हाला माहिती कमी असल्याचे सांगत न्यायालयाने महाधिवक्त्यांना विचारले तुम्ही स्वतः ही याचिका काढून घेणार की आम्ही क्वॅश करू अशी विचारणा केलीय. त्यावर महाधिवक्त्यांनी याबाबत सरकारला विचारून सांगतो असे उत्तर दिले. या वक्तव्यावर न्यायालयाने आम्ही तुम्हाला ऐकायला नाही बसलो असे उत्तर दिलेय. तसेच महाधिवक्त्यांनीच ही माहिती दिल्याने हि याचिका दाखलच अद्याप झालेली नसल्याचे स्पष्ट केले.

परब यांनीही ही मी ही त्यांच्याशी बोलूनच तुम्हाला सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावर तुमची याचिका दाखल झाली का ? असा सवाल करताच सत्ताधारी बाकावरील मंत्री निरूत्तर झाले. त्यानंतर पुन्हा फडणवीस यांनी तुमची इच्छा असेल तर मी याविषयावर बोलणार नाही म्हणत हा विषय संपविला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हस्तक्षेप करत न्यायालयात याचिका आहे. आणि इथे सगळ्या वकिलांनीच युक्तीवाद सुरु केल्याची प्रेमळ सूचना करत सर्वच वकिल असल्याने जरा सबुरीने आणि शांततेत घ्या असा सल्लाही सत्ताधारी आणि विरोधकांना केला.

अर्णव गोस्वामी आणि कंगणा राणावत यांच्या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली आहे. आम्ही त्या दोघांच्या वक्तव्याशी सहमत नाही. गोस्वामीने माझ्या विरोधातही अशी ट्रायल सुरु केली होती. परंतु त्याला आम्ही आत नाही टाकले. त्याला मी ही उत्तर दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *