Breaking News

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे तर परमबीर सिंग गृहरक्षक प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी
अॅटालिया बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी आढळून आल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत देण्यात येत होते. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाल्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.
आयपीएस अधिकारी हेमंत नागराळे हे १९८७ च्या बॅचचे अधिकारी असून पोलिस दलातील महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. याचबरोबर नागराळे यांच्याकडे सध्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मात्र आता त्यांच्याकडे मुंबई पोलिस दलाचा कारभार सोपविण्यात आला आहे.
रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे राज्य सुरक्षा मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली असून परमबीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण भलतेच तापले होते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या एक बैठक होवून याविषयाच्या अनुषंगाने चर्चाही झाली. त्यानंतर पोलिस दलातील बदलाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही निवडक पोलिस अधिकाऱ्यांची चर्चाही केली. त्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलातील फेरबदल केल्याचे जाहिर केले.

Check Also

मुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *