Breaking News

अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना ४८ तासांचा अल्टीमेटम कायदेशीर नोटीस पाठवित दिला इशारा

मुंबईः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याच्या व्हिडिओ अल्बमला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याने फायनान्स केल्याचा आरोप करत त्यासोबतचा फो अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला. त्यावर अमृता फडणवीस यांनी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांनी केला असून नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात ते ट्विट डिलीट करावे आणि जाहिर माफी मागावी अन्यथा मानहानी आणि फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा मलिक यांना दिला.
नवाब मलिक यांनी सुरुवातीला जयदीप राणा याच्या एकट्याचा फोटो शेअर केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. त्यानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यावेळचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा असलेल्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत त्या गाण्याच्या निर्मितीला जयदीप राणा याचे फायनान्स होते असा आरोप केला होता.
मी एक बँकर असून गायनाच्या क्षेत्रातही माझ्या हुशारीवर स्थान निर्माण केले आहे. त्या गाण्याच्या शुटींगच्यावेळी एकट्या राणा यांच्याबरोबरच फोटो घेतला नसून त्यावेळच्या सर्व क्रु मेंबर्ससोबत फोटो काढले आहेत. तसेच त्यावेळी सर्व क्रु मेंबर्स उपस्थित होते. तरीही मलिक यांनी जाणीवपूर्वक एकच फोटो निवडून तो जाणीवपूर्वक ट्विट केला. त्यामागे माझी प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे दिसून येत असल्याचे फडणवीस यांनी पाठविलेल्या नोटीस म्हणाल्या.
माझे पती हे राजकारणात असून त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. तर आता ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे संपुर्ण कुटुंबियांच्या प्रतिमेला धक्का लागत असून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होत असल्याची बाब त्यांनी नोटीस नमूद केली.
सदरचा व्हिडिओ हा रिव्हर मार्च या संस्थेने तयार करून त्यासाठी त्या संस्थेने जयदीप राणा हायर केले होते. त्यामुळे माझ्या सोबत फोटो काढला म्हणून त्यांचे आमच्याशी संबध असल्याचे सिध्द होत नाही. त्याचबरोबर हजारो लोक आम्हाला भेटत असल्याने प्रत्येकाची माहिती घेता येत नसल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात सदरचे ते ट्विट डिलीट करावे आणि सार्वजनिकस्तरावर माफी मागावी अन्यथा फौजदारी गुन्ह्यांसह मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना दिला.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *