Breaking News

शाह-जी व्हिडीओवरून महाराष्ट्रात रणकंदन शिवसेना, छत्रपतींच्या वंशजाच्या नाराजीनंतर भाजपकडून खुलासा

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याप्रकरणीचा वाद नुकताच क्षमला. तोच दिल्ली निवडणूकीच्या निमित्ताने तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरचा वापर करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांच्या फोटोचा वापर छत्रपती शिवाजी आणि तान्हाजी स्वरूपात केल्याने केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. या व्हिडीओवरून शिवसेना आणि छत्रपतींचे वंशज खासदार संभाजी राजे यांनी भाजपाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अखेर भाजपाला या व्हीडीओशी संबध नसल्याचे जाहीर करावे लागले.
शाह जीच्या व्हीडीओ व्हायरल होताच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकेची झोड उठवित छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला कधीही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तसेच काही दिवसापूर्वीं शिवाजी महाराजांच्या वंशज्यांनी शिवसेनेविरोधात वक्तव्य केले होते. आता त्या वंशजांनी आपली भूमिका मांडावी अशी मागणी केली. तसेच प्रसारमाध्यमांमध्येही यावरून टीकेची झोड उठविली. त्यामुळे अखेर संध्याकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोण्या पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजपा या व्हिडिओचा निषेध करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच या व्हिडिओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे असल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र गतवेळीप्रमाणे दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांनी याप्रश्नी पुन्हा एकदा मूग गिळून बसणे पसंत केले.
दरम्यान, सदरचा व्हीडीओ युटूब या व्हीडीओ चॅनलवरून काढून टाकण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती शिवाजी महारात, तान्हाजी यांची तुलना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी होणे शक्यच नसल्याचे मत व्यक्त केले. तर मंत्री अमित देशमुख यांनी अशी तुलना होणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *