Breaking News

मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही… तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती

सिंधुदुर्ग: प्रतिनिधी

राज्यात तीन चाकी रिक्षा सरकार असून तिघांच्या दिशा वेगळ्या आहेत. हे सरकार विफल… जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे. आम्ही शब्द मोडला नाही… बिहारात नितीशजींची जागा कमी असून ही आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले. मी कधी काही बंद खोलीत करत नाही, जे काही आहे ते जाहीर करतो. मी कधीही बंद खोलीत शब्द दिला नाही. प्रत्येक सभेत सेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता.  तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो फडणवीस मुख्यमंत्री बनणार, तेव्हा का विरोध केला नाही? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी शिवसेनेला केला. तसेच आम्ही तुमच्या मार्गावरून चाललो असतो तर तुमचे अस्तित्व राहीले नसते असा टोलाही त्यांनी सेनेला लगावला.

भाजपा खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला शाह यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

३७० कलम मोदींनी हटवले, अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिर बनवत आहेत. भाजपा सिद्धांतासाठी राजकारण करतो तर शिवसेना राजकारणासाठी सिद्धांतांना तोडमरोड करते अशी टीका करत महाराष्ट्रात इतके मोठे वादळ आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोणी पाहिले का इथे ? देवेंद्रजी फिरत होते. हे सरकार साखर कारखान्यांना त्रास देत आहे, पण आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत असा इशारा देत आम्ही तुमच्या मार्गावरून चाललो असतो तर तुमचे अस्तित्व आज दिसले नसते, आम्ही जनतेच्या सेवेच्या मार्गावर चालतो असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

आरोग्य विभागाचा पुनर्विचार करावा लागेल हे कोविडमुळे दिसले. त्यामुळे केंद्रीय बजेटमधे आरोग्य क्षेत्रावर सर्वाधिक तरतूद करण्यात आली. मोदीजींच्या नेतृत्वात आरोग्यक्षेत्रात क्रांती होत आहे. कोविड काळात देशात आरोग्य क्षेत्रात सर्वात वाईट काम असल्याचा आर्थिक पाहाणी अहवाल सांगण्यात आले आहे. कोवीड काळात भाजपा कार्यकर्ते सरकारच्या पाठीशी… रस्त्यावर उतरून चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले. “ते” प्रत्येक प्रॉजेक्टला विरोध करतात आणि तरीही प्रॉजेक्ट पूर्ण झाला की त्या यशाचे श्रेयही घेतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मुघलांचे राज्य असताना त्या घोर अंधारात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वराज्याची यात्रा आज मोदीजींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होण्याकडे सुरू आहे. छ. शिवाजी महाराजांनी याच जिल्ह्यातून नौसेनेची सुरुवात केली. याच सिंधुदुर्गाच्या भूमीवर विकास कामांची एका मागे एक मालिका नारायण राणेंनी उभी केल्याचे कौतुक शाह यांनी राणेंचे केले.

जो स्वतः वरच्या अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही, तो जनतेला न्याय मिळवून देऊ शकत नाही. राणे सारख्या संघर्षशील व्यक्तींचा कसा सन्मान करायचे हे भाजपाला नीट माहित आहे. स्थानिक युवक आता इथेच वैद्यकीय  शिक्षण घेऊ शकेल. पुस्तकांनीच मला घडवलंय…मी लायब्ररीचा प्रॉडक्ट असल्याचे सांगत लायब्ररीत केवळ मेडिकलची पुस्तके न ठेवता देशाचा इतिहास मुलांना कळेल, अशी लायब्ररी बनवा अशी सूचना करत जितकी लायब्ररी समृद्ध तितकी युवा पिढी समृद्ध असे ही ते म्हणाले.

१३० कोटींच्या या देशात वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष होते. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कमकुवत होत. मात्र मोदींच्या नेतृत्वात ज्याप्रकारे कोरेनाशी लढाई केली आहे त्याचे जगात स्वागत होत आहे. व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई किट इथे बनत नव्हते. अवघ्या १० महिन्यात आपण एक नंबर निर्यातक झालो आहोत. लॉकडाऊनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले. सर्वात कमी मृत्यू दर आणि सर्वात जास्त रिकवरी रेट भारताचा आहे

आपले डॉक्टर्स व पॅरा मेडिकल स्टाफ ने जी लढाई लढली त्याला तोड नाही. आपण तयार केलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट आज जगात स्वीकारली गेली आहे. जगात फक्त डॉक्टर आणि सरकार लढत असताना भारतात यासोबतच जनतेचे सर्व घटक या लढाईत उतरले, ७०%  वॅक्सिन भारत जगाला पुरवत आहे. वेगाने वॅक्सिनेशन होत आहे. तुम्ही अशा वेळी मेडिकलला प्रवेश घेतलाय ज्यावेळी आपण आरोग्यसेवेवर सर्वाधिक भर देत आहोत. ७० वर्षात मेडिकल कॉलेज बांधले त्याच्या ५०% गेल्या केवळ सहा वर्षात बांधलेत २ एम्स होते… आज २२  बांधतो आहोत. मेडिकल च्या जागाही वाढवल्यात. आरोग्य क्षेत्रात जोरदार बदल घडवत आहोत. आरोग्य क्षेत्रीचे बजेट १३७% वाढवले आहे. नीट नेस्ट परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना शोषणातून वाचवलंय. पंतप्रधान जनआरोग्य योजनेत आयुष्मान भारत योजनेत सामान्यांना गरीबांना पाच लाखापर्यंत उपचार खर्च केंद्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भाषणे झाली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *