Breaking News

मी महाराष्ट्राची मराठी मुलगी अभिनेत्री अमिषा पटेलचा असाही मराठी बाणा

मुंबई : प्रतिनिधी

बॉलिवुडमधील सर्वांनाच सध्या मराठीचे वेध लागले आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी चित्रपटात योग्य भूमिका साकारण्याची संधी न मिळालेले काही कलाकार मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आपलं मराठी प्रेम दाखवत आहेत. ‘कोई मिल गया’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री अमिषा पटेलला ‘लूझ कंट्रोल’ या मराठी चित्रपटाच्या म्युझिक आणि ट्रेलर लाँच समारंभाला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहण्याची संधी लाभली. या सोहळ्यात तिने चक्क मराठीत संवाद साधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

प्रेम झांगियानी, चेतन फिल्म्स, बँग ऑन फिल्म्स, अमदावाद पिक्चर्स, एशियन फिल्म्स आणि शुभम पिक्चर्स अशा जवळजवळ अर्धा डझन निर्मात्यांना एकत्र आणणाऱ्या ‘लूझ कंट्रोल’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असलेल्या अमिषाने मराठी बाणा दाखवत सोहळ्यात रंग भरला. अमिषाने मराठीशी आपलं किती जवळचं नातं आहे ते सांगितलं. ती म्हणाली की, माझं आडनाव जरी पटेल असलं, तरी मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे. माझी आजी ही पुण्यातील गोखले म्हणजे शंभर टक्के ब्राम्हण आहे. मी कायम आजीला भेटायला पुण्यात जायचे. त्या काळच्या आठवणी खूप गोड आहेत. मराठी सिनेमे पाहायला मला आवडतात. ‘लूझ कंट्रोल’ या चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यावर यात काहीतरी वेगळं दडल्याचं जाणवलं. मराठीतील आघाडीच्या विनोदी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. गाणी सुद्धा खूप छान आहेत. त्यामुळे आता हा सिनेमा हिंदीत बनवण्याची माझी इच्छा आहे.

‘लूझ कंट्रोल’चं लेखन-दिग्दर्शन अजय सिंग यांनी केलं आहे. अजित साटम, रियाझ इनामदार, जिग्नेश पटेल, साकिम शेख, मिहीर भट्ट यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संवाद प्रियदर्शन जाधव आणि चैतन्य सरदेशपांडे यांनी लिहिले आहेत. मुर्झी पागडीवाला यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. वैभव देशमुख आणि सुजय जाधव यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार मिहीर भट्ट आणि रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. आदर्श शिंदे, जसराज जोशी, सुझान डिमेलो, अमित मिश्रा, रोहित राऊत, अँजेला अल्मेडा या गायकांनी ‘लूझ कंट्रोल’साठी गायन केलं आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, आरती सोळंकी, प्राजक्ता हनमघर, मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, अजय पूरकर, पूजा कासेकर, उमेश जगताप, प्रवीण खांडवे आदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

 

Check Also

मुंबईत आलेल्या बिहारच्या त्या एसपींची महाराष्ट्र पोलिसांनी केली व्यवस्था राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या तपासासाठी आलेल्या बिहार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *