Breaking News

मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरते दवाखाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे. विशेषतः गरोदर महिला आहेत त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी ही सुविधा असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टींग, लॅब, ८१ प्रकारची औषधे, ४० प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी व महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हयाला दोन – दोन फिरते दवाखाने असणार आहे. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल असेही  त्यांनी सांगितले.

दरम्यान याचे मुख्यमंत्र्यांच्या किंवा रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

 

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *