Breaking News

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी दोन दिवसांचे वेतन देणार विविध संघटनांनी सरकारला दिले निवेदन

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविधस्तरातून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकिय आणि निमशासकिय अशा विविध महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिकांसह प्राधिकरण सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक ते दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्याच्या सेवेतील आयएएस आणि आयपीएस अधिकारीही आपले दोन दिवसांचे वेतन देणार आहेत. याशिवाय निवृत्त झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातूनही दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शासन निर्णयाने दिली.

आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, राजपत्रित अधिकारी मे महिन्यातील दोन दिवसांचे वेतन, तर ब, क, ड आदी श्रेणीतील अधिकारी-कर्मचारी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. कोरोनाच्या सामन्यासाठी आणि लसीकरणासाठी राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे राज्याला आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यादृष्टीने राज्यातील विविध कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी दोन दिवसाचे तर एक दिवसाचे वेतन कपात करून घ्यावे अशा आशयाचे निवेदन राज्य सरकारला दिले.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यतीरिक्त अन्य व्यक्ती, संस्था, कंपन्यांनाही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक देणगी देता येवू शकतात. तसेच ही देणगी दिल्यास आयकरात सूटही मिळणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९

बचत खाते क्र.३९२३९५९१७२०

स्टेट बँक ऑफ इंडिया

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई-४००००१

शाखा कोड-००३००

आयएफएस कोड-SBIN0000300

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *