Breaking News

अजित पवारांनी केली मोठी घोषणा : पुण्यात लेव्हल ३ चे निर्बंध आणखी शिथिल आढावा बैठकीनंतर केली दिली माहिती

पुणे : प्रतिनिधी

पुणेसह ११ जिल्ह्यात लेव्हल ३ चे निर्बंध लागू केल्याने नाराज झालेल्या व्यापाऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात करत दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर आज अखेर पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेव्हल ३ चे निर्बंध शिथिल करत पुणे शहरातील दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यत तर हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली.

गेल्या आठवड्यात नागरीक आणि राजकिय पक्षांच्या दबावासमोर झुकत राज्य सरकारने २५ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने निर्बंध शिथिल करत नागरीकांना दिलासा दिला. मात्र ज्या ११ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये मात्र लेव्हल ३ चे निर्बंध लागू केले. त्यामुळे पुणे जिल्ह्याचाही समावेश होता. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांकडून सातत्याने निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीवरून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होते.

त्यामुळे उद्या सोमवारपासून पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

७ टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा थांबवली येईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंवडकरांनी नियमांचं पालन केलंच पाहिजे. दुकानात विक्री करताना दुकानाचे मालक आणि सेल्समन मास्क वापरत नाही अशी तक्रार आहे. मुभा देत असताना करोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. पुण्यातील प्रमाण ३.३ आणि पिंपरी चिंतवड ३.५ आणि ग्रामीणचं ५.५ आहे. ग्रामीणचा नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल. पुण्याकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *