Breaking News

अजित पवार म्हणाले, आम्हाला कळायचंच नाही हे काय चाललंय… पर्यटन विभागाच्या बजेटचा सांगितला किस्सा

मुंबईः प्रतिनिधी
अनेकजण देश-विदेशात फिरुन आलेले आहेत. परंतु अनेकांनी महाराष्ट्र अजून नीट बघितलेला नाही. जग फिरण्याआधी पहिल्यांदा आपला महाराष्ट्र फिरला पाहीजे. आपली पर्यटन स्थळ बघितली पाहीजे. त्यानंतर जग बघायला बाहेर पडा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पर्यटन दिनाचे औचित्य साधत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मंत्री राज्यमंत्री उपस्थित होते.
पर्यटन क्षेत्रामध्ये अमर्याद अशी संधी उपलब्ध आहे. जे-जे प्रस्ताव आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे यांनी आणले त्या सगळ्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. मी पण बरेच वर्ष समाजकारण, राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. १९९१ -९२ ला मला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. या सर्व गोष्टींना तीस वर्षे उलटले आहेत. आमच्या पाठीमागचा इतिहास बघितला तर पर्यटन खाते ज्यांच्याकडे असायचं निधी कमी असायचा पण शेवटच्या मार्च एंडला त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात आणि मतदारसंघातचं सगळे पैसे जायचे. तुम्ही हे तपासून पाहू शकता. आम्हाला हे कळायचचं नाही हे काय चाललं, या पद्धतीच्या घटना घडायच्या अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं कांम आता पुर्ण झालेल आहे. या चिपी विमानतळावर आता एक पुस्तकचं लिहायला पाहिजे, किती टर्म चिपी चिपी चाललं. पण चिपी काही पुर्ण होईना. दरम्यान, मुंबई ते सिंधदुर्ग विमानसेवा ९ तारखेला सुरु होत आहे. दरम्यान, मुंबई ते सिंधदुर्ग विमानसेवा ९ तारखेला सुरु होत आहे. आम्ही पण मुख्यमंत्र्याबरोबर जात आहोत. आताच त्यांना सांगितले आहे. विमानात मला जागा ठेवा अशी मिश्किल विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

Check Also

दिपक केसरकर यांची घोषणा, शाळेत जाणाऱ्या शिक्षकांसाठीही ड्रेस कोड

येत्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. पुरुष शिक्षकांना शर्ट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *