Breaking News

बलात्कार, गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात तिसरा कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा अजित पवारांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी

राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगारी, बलात्कार आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढली असून या तिन्ही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला असून महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी चिंताजनक बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभेत विरोधकांच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना अजित पवार यांनी वरील मत व्यक्त केले.

देशात उत्तर प्रदेश, बिहार सारखी राज्ये ही एक आणि दोन नंबरवर आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे महाराष्ट्राचे नाव तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा वचक राहीला नसल्यानेच गुन्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याला कारण पोलिसांच्या कार्यामध्ये राजकिय हस्तक्षेप वाढल्यानेच पोलिसांचा वचक राहीला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानामध्ये चोरीची घटना झाली. तसेच नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटण्याचा प्रयत् करणे, एका वाहनातून २५ रायफली सारख्या घटना घडल्या. या केवळ न केवळ पोलिसांचा वचक राहीला नसल्यानेच अशा गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. याचबरोबर पोलिसांना चांगली घरे, त्यांना सुविधा, शस्त्रे, वाहने आणि फिटनेस बाबत राज्य सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमचे काही कळत नाही

शिवसेनेचे सदस्य बसलेल्या बाकाकडे पहात तुमचे तर काही कळत नाही. तुम्ही नाराज आहात का? आनंदी आहात? सरकारसोबत आहात की नाही? त्यामुळे तुम्हीच याप्रश्नावर प्रकाश टाका असे म्हणत शिवसेनेची राजकिय कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

तुमच्याच पक्षाचे नेते सांगतात पायावर गोळी मारा

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या एका मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. आमच्या सरकारच्या काळात मावळमध्ये अशीच घटना घडली. त्यावेळी काय झाले माहीत आहे ना? त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली. तरीही तुम्ही शेतकऱ्यांवर गोळीबार करताय. त्यातच तुमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणतात पायावर गोळी मारा म्हणून तुम्हाला काय लाज लज्जा आहे की नाही? की सगळीच सोडून दिलीय असा उपरोधिक टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

तुमचे आमदार घाबरतात म्हणून ते सगळं आम्हाला देतात

भाजपचे आमदार आशिष देशमुख बोलले म्हणून त्यांना नोटीस बजावल्याचा आज कुठे तरी वाचलं. तुमच्या पक्षाच्या आमदारांना बोलता येत नाही कारण ते घाबरतात. त्यामुळे त्यांना जे प्रश्न सतावतात ते सर्व प्रश्न आम्हाला देतात. तसेच त्याची कागदपत्रेही आम्हाला देतात. राज्यात सत्तेत येवूनही तुमच्या अनेक मंत्र्यांना कळत नाही सन्मानीय कोणाला म्हणावे ते. दुपारी एक मंत्री एका तहसीलदाराचा उल्लेख सन्मानीय तहसीलदार म्हणून आपल्या उत्तरात बोलत होते. त्यांना कोणी तरी सांगा आता आपण सरकारमध्ये आलोय आणि तहसीलदाराला सन्मानीय म्हणायचे नसते.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *