Breaking News

Airtel, Vi नंतर आता Jio चेही रिचार्ज महागले २१ टक्क्याने महाग झाले

मुंबईः प्रतिनिधी
Airtel आणि Vi (Vodafone-Idea) नंतर, Jio ने देखील आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. जिओने आपल्या प्लॅनमध्ये २१% पर्यंत वाढ केली आहे. Jio च्या ७५ रुपयांच्या प्लॅनसाठी १ डिसेंबरपासून ९१ रुपये भरावे लागतील.
नवीन किंमती
१२९ रुपयांच्या प्लॅनची किंमत १५५ रुपये, ३९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ४७९ रुपये, १,२९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत १,५५९ रुपये आणि २,३९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता २,८७९ रुपये असेल. डेटा टॉप-अपच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. आता ६ GB डेटासाठी ५१ ऐवजी ६१ रुपये, १२ GB डेटासाठी १०१ ऐवजी १२१ रुपये आणि ५० GB डेटाची किंमत २५१ ऐवजी ३०१ रुपये असेल. दर वाढवल्यानंतरही जर आपण Airtel, Vi आणि Jio च्या प्लॅनची तुलना केली तर तुम्हाला दिसेल की Jio चे प्लान्स इतर दोन कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. बहुतेक Airtel आणि Vi प्लॅनचे दर समान आहेत.
याआधी एअरटेलने आपले सर्व १२ प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. आता ग्राहकांना रिचार्जसाठी किमान २० रुपये आणि कमाल ५०१ रुपये अधिक खर्च करावे लागतील. Vodafone-Idea ने जुन्या प्लॅनवर नवीन किमती देखील लागू केल्या आहेत. दोन्ही कंपन्यांचे प्लॅन आणि किमती जवळपास सारख्याच आहेत. देशभरात एअरटेलचे ३५० दशलक्ष आणि व्होडाफोन-आयडियाचे २७० दशलक्ष ग्राहक आहेत. दोन्ही कंपन्यांनी प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढवण्यासाठी टॅरिफ योजना महाग केल्या आहेत.
एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाने आपल्या प्रीपेड प्लॅनला ५०० रुपयांपर्यंत महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल प्रमाणे वोडाफोन सुद्धा प्रति यूजर आपले सरासरी रिव्हेन्यू वाढण्याचा प्रयत्न करीत आहे. किंमतीत वाढ करण्यात आल्यानंतर प्लॅनची किंमत एअरटेल प्रमाणे ७९ रुपयांऐवजी आता ९९ रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसाची वैधता सोबत ९९ रुपयाचा टॉकटाइम आणि २०० एमबी डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये कॉलिंग चार्ज १ पैसे प्रति सेकंद आहे.
वोडाफोन आयडिया २१९ रुपयाचा प्लॅन आता २६९ रुपयांना मिळणार आहे. २८ दिवसाची वैधता सोबत येणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस आणि डेली १ जीबी डेटा मिळेल. या शिवाय २९९ रुपयाचा प्लॅन आता ३५९ रुपयांना झाला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी डेली २ जीबी डेटा ऑफर करते. २८ दिवसाची वैधता सोबत येणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते.

Check Also

टाटा ने काढली विकायला कंपनीतील ०.६५ टक्के मालकी हिस्सा ९ हजार ३६२ कोटींची कंपनीला आवश्यकता

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्स ₹९,३६२.३ कोटी ($१.१३ अब्ज) च्या ब्लॉक डीलद्वारे टाटा कन्सल्टन्सी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *