Breaking News

सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढ सुरूच, घरगुती एलपीजी सिलेंडर महागला गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ

मुंबईः प्रतिनिधी
सणांच्या आधी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे.
दर वाढीनंतर आता एलपीजी सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याचबरोबर ५ किलोचा सिलिंडर आता ५०२ रुपयांना मिळणार आहे. १ ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर ४३.५ रुपयांपर्यंत वाढ केली होती.
मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी आणि डिझेलच्या भावात ३५ पैशांनी वाढ झाली आहे. या महिन्यात पाचव्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल प्रति लीटर १०० रुपयांच्या वर गेले आहे.
या वर्षी आतापर्यंत पेट्रोल १९.०३ रुपयांनी आणि डिझेल १७.३६ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारीला पेट्रोल ८३.९७ रुपये आणि डिझेल ७४.१२ रुपये प्रति लीटर होते. आता ते १०२.९४ आणि ९१.४२ रुपये प्रति लीटरवर आहे. म्हणजेच ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल १९.०३ रुपयांनी आणि डिझेल १७.३६ रुपयांनी महाग झाले आहे.
२६ राज्यांमध्ये पेट्रोल आणि ६ राज्यांमध्ये डिझेल १०० च्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पुद्दुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे.
त्याचबरोबर उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओरिसा, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी डिझेलचा दर १०० रुपयांपेक्षा जास्त आहे.
तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या ग्राहकाला आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड ९२२४९९२२४९ आणि बीपीसीएल ग्राहकाला ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून पाठवावा लागेल. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर ‘HPPrice’ पाठवून आजची किंमत जाणून घेऊ शकतात.

Check Also

१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *