राज्यात कांदा प्रश्नावरून तापलेले वातावरण शांत करण्यासाठी दिल्लीतील मोदी सरकारच्या आदेशान्वये महाराष्ट्रातल शेतकऱ्यांचा किमान २ मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जाहिर केला. मात्र तरीही शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले नाही. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहित कांदा प्रश्नी मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यातच आजच्या घडीला राज्यात ४० मेट्रिक टन कांदा सध्या कांदा चाळीमध्ये उपलब्ध आहे. मात्र राज्य सरकार या कांद्यापैकी फक्त २ लाख मेट्रीक टन नाफेड मार्फत खरेदी करणार आहे. त्यामुळे आजही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. त्यातच राज्य सरकारने २ लाख मेट्रीक टनाची खरेदी करणार असल्याचे जाहिर करून फक्त आतापर्यंत ५०० मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे आहे ती खरेदी केंद्रे कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.
यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिल्याची माहिती देत कांदा खरेदी करण्यासाठी आणि खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला पत्र लिहिताना कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून खरेदी सुरू आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे. सध्या नाफेडकडून ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे असलेला उपलब्ध कांदा पाहता या केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.