Breaking News

कृषी व संलग्न अभ्यासक्रमांची फि भरण्यासाठी दिली सवलत कृषीमंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क-फि भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शैक्षणीक वर्ष २०२०-२१ मधील तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एक रकमी न भरता तीन हप्त्यात सत्र समाप्ती परिक्षेपूर्वी भरायची सवलत दिली आहे. विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीची बैठक होऊन त्यात शुल्क भरण्यासाठी सवलत देण्याचा ठराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्यात उद्भवलेल्या आपत्तीमुळे कृषी व संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगामी शैक्षणिक वर्षांत शुल्क भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी कृषीमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत कृषीमंत्र्यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि अधिष्ठाता यांना निर्देश दिले होते.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *