Breaking News

कोरोना: ५० हजाराच्या जवळ; तर मुंबईत राज्यापेक्षा जास्त पॉझिटीव्ह रूग्ण ४९ हजार ४४७ नवे बाधित, ३७ हजार ८२१ बरे झाले तर २७७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने पसरत असून १ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ४३ हजार तर मुंबईत ८ हजारापार रूग्णांची नोंद झाली होती. कालही रूग्णसंख्या ४७ हजारावर पोहचली तर आज थेट ४९ हजार ४४७ इतके नवे बाधित राज्यात तर मुंबईत ९ हजार १०८ इतकी बाधितांच्या संख्येची नोंद झाली आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईत ४ लाख ४१ हजार ४७५ इतके बाधित असून राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४ लाख १ हजार १७२ वर पोहोचल्याने या दोन्ही संख्येत ४० हजाराचा फरक आहे.

ठाणे शहर व ग्रामीण मध्ये २ हजाराहून अधिक तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत आजही १ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. नाशिकमध्ये जवळपास ४०००, अहमदनगरमध्ये हजाराहून अधिक, जळगांवमध्येही एक हजाराहून अधिक, पुणे शहर व  ग्रामीण मध्ये ८ हजाराहून अधिक, पिंपरी चिंचवडमध्ये २ हजाराहून अधिक, नागपूरमध्ये जवळपास ४००० बाधितांची नोंद आज झाली.

मागील २४ तासात ३७ हजार ८२१ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ इतके घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.४९% एवढे झाले आहे. राज्यात आज २७७  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% इतका असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९,१०८ ४,४१,४७५ २७ ११,७५४
ठाणे ७०३ ५३,१५७ १,०२२
ठाणे मनपा १,४८२ ८३,४१६ १,३३१
नवी मुंबई मनपा १,३२७ ७४,६०१ १,२०५
कल्याण डोंबवली मनपा १,२७८ ८७,२७२ १६ १,१३५
उल्हासनगर मनपा १६२ १४,५१६ ३७५
भिवंडी निजामपूर मनपा १३९ ८,१७८ ३५८
मीरा भाईंदर मनपा ४०० ३३,७०६ ६८५
पालघर १९३ १९,८१२ ३२७
१० वसईविरार मनपा ३७५ ३६,०९९ ६९१
११ रायगड २५६ ४२,७०१ १,०२४
१२ पनवेल मनपा ५६६ ४०,४३८ ६७१
ठाणे मंडळ एकूण १५,९८९ ९,३५,३७१ ५८ २०,५७८
१३ नाशिक १,४४१ ५९,१८७ ८९९
१४ नाशिक मनपा २,४५९ १,२३,५३३ १५ १,१९५
१५ मालेगाव मनपा ६३ ७,१७६ १८१
१६ अहमदनगर १,४६४ ६४,७७९ ७९७
१७ अहमदनगर मनपा ५०० ३४,२५३ ४३६
१८ धुळे २३० १४,४५१ २०८
१९ धुळे मनपा १३७ १२,८५१ १७५
२० जळगाव ८३२ ६५,३८६ १,२३७
२१ जळगाव मनपा ४७२ २३,६९६ ३६५
२२ नंदूरबार ८२० २०,००४ ३०२
नाशिक मंडळ एकूण ८,४१८ ४,२५,३१६ २८ ५,७९५
२३ पुणे २,२९७ १,२९,३९५ २,२५७
२४ पुणे मनपा ५,७७८ २,९१,९४७ ३७ ४,७७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,७९८ १,४२,९४४ १,३८९
२६ सोलापूर ४१२ ५०,८२६ १,२७३
२७ सोलापूर मनपा २९५ १८,६९६ ६४९
२८ सातारा ६८८ ६७,४२७ १,८९०
पुणे मंडळ एकूण १२,२६८ ७,०१,२३५ ५९ १२,२३७
२९ कोल्हापूर ९७ ३५,९२२ १,२७०
३० कोल्हापूर मनपा ८७ १५,८२० ४२७
३१ सांगली १५५ ३५,८२८ १,१८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४९ १९,५४४ ६५१
३३ सिंधुदुर्ग ७० ७,४८६ १८९
३४ रत्नागिरी ५७ १३,१९९ ४२९
कोल्हापूर मंडळ एकूण ५१५ १,२७,७९९ ४,१४७
३५ औरंगाबाद ४३४ २४,७०१ ३६४
३६ औरंगाबाद मनपा ७०४ ६३,०३३ ३१ १,०६५
३७ जालना ४०७ २४,३५२ ४१५
३८ हिंगोली ७७ ७,३६१ ११२
३९ परभणी १०१ ७,७२१ १८९
४० परभणी मनपा १५४ ७,६३५ १६९
औरंगाबाद मंडळ एकूण १,८७७ १,३४,८०३ ३५ २,३१४
४१ लातूर ३९० २६,८५१ ५०३
४२ लातूर मनपा २८८ ८,४९० २५९
४३ उस्मानाबाद ३४९ २२,३१५ ५९७
४४ बीड ४४८ २७,२१२ ६३१
४५ नांदेड ७१४ १८,२६० ४३९
४६ नांदेड मनपा ५०४ २८,८०१ १३ ३९७
लातूर मंडळ एकूण २,६९३ १,३१,९२९ ३४ २,८२६
४७ अकोला १५३ १०,८८० १६६
४८ अकोला मनपा १६४ १८,६६६ ३०५
४९ अमरावती १४७ १७,५९९ ३०४
५० अमरावती मनपा १०६ ३२,२४७ ३५६
५१ यवतमाळ २३६ २९,२०४ ५६१
५२ बुलढाणा ८४९ २९,५८२ २९३
५३ वाशिम २८५ १७,०८९ १९१
अकोला मंडळ एकूण १,९४० १,५५,२६७ १७ २,१७६
५४ नागपूर १,०९० ४०,६८४ १४ ९३८
५५ नागपूर मनपा २,८५३ २,०१,२९७ २१ ३,१०१
५६ वर्धा ३०० २२,३२२ ३८३
५७ भंडारा ८३७ २०,२६० ३२२
५८ गोंदिया २५० १६,६४८ १८१
५९ चंद्रपूर २२९ १८,८४९ २७१
६० चंद्रपूर मनपा १२४ ११,३०९ १७८
६१ गडचिरोली ६४ १०,२८८ ११०
नागपूर एकूण ५,७४७ ३,४१,६५७ ४० ५,४८४
इतर राज्ये /देश १४६ ९९
एकूण ४९,४४७ २९,५३,५२३ २७७ ५५,६५६

आज नोंद झालेल्या एकूण २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७८ मृत्यू, पुणे-२२, औरंगाबाद-२१, नागपूर-१६, ठाणे-६, यवतमाळ-५, नाशिक-२, अकोला-१, बुलढाणा-१, हिंगोली-१, लातूर-१, नांदेड-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *