Breaking News

१२१ वर्षानंतर नीरजच्या रूपाने अॅथेलिटीक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक यंदाच्या टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताच्या मुकूटात पहिले गोल्ड

टोक्यो-वृत्तसंस्था: प्रतिनिधी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात अॅथलेटीक्समधील भालाफेक क्रिडा खेळात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळविले असून खेळाडू नीरज चोप्राच्या निमित्ताने ही गोष्ट होवू शकली आहे.तसेच आतापर्यत भारताच्या नावावर ७ पदके जिंकल्याची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे १२१ वर्षानंतर या क्रिडा प्रकारात भारताने सुवर्ण पदक जिंकले आहे.

१९०० मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व नॉर्ममन पिचर्ड या इंग्रज अधिकाऱ्याने अॅथलेटीक्समध्ये प्रधिनिधित्व केले होते. त्या स्पर्धेत पिचर्ड याला सिल्व्हर पदक मिळाले होते. त्यानंतर तब्बल १२१ वर्षानंतर नीरजच्या रूपाने भारताला पहिले सुवर्ण पदक अॅथलेटीक्समध्ये मिळाले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अभिनव बिंद्रा याच्यारूपानने भारताने सुवर्ण पदक कमावले होते. त्यानंतर हे पहिलं सुवर्णपदक आहे.

भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.

नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.

ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५v मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

Check Also

Microsoft , google वरही काश्मिरी भाषा उपलब्ध होणार

जगभरातील अनेक देशांच्या आणि राज्याच्या राज भाषांचे इंग्रजीत आणि इंग्रजीतून स्थानिक भाषेचा वापर करणाऱ्या तरूणाईला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *