Breaking News

आदित्य ठाकरेंना कोविडची लागण ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोविडची लागण झाली असून संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात राहून स्वत:ची चाचणी करावी असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केले.

प्रकृती अस्वस्थामुळे आदित्य ठाकरे यांनी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवून घेतले. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी असे आवाहन केले.

दरम्यान आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच अनेक मंत्री, युवा सैनिक आणि शिवसैनिकांनी त्यांना लवकर बरे होवून परत यावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *