Breaking News

आणि लसीच्या सुरक्षित पुरवठ्यासाठी सीरमने ही कंपनीच खरेदी केली सीरमचे मुख्याधिकारी अदार पुनावाला यांची ट्विटरद्वारे माहिती

पुणे-जर्मनी : प्रतिनिधी

ऑक्सफर्डच्या फॉर्म्युल्यावर तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड या कोरोनारोधक लसीचा पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित करता यावा यासाठी जर्मनस्थित SCHOTT AG Kaisha या कंपनीचे ५० टक्के समभाग सीरम इन्स्टीट्युटने खरेदी केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिली. त्यामुळे यापुढे सीरम या SCHOTT AG कंपनीची भागीदार म्हणून ओळखली जाणार आहे.

SCHOTT ही कंपनी मुळची काच उत्पादन निर्मितीतील आहे. या कंपनीकडून लसीची साठवणूक करण्यासाठी लागणाऱ्या व्हावल्स अर्थात छोट्या कुप्यांची निर्मिती करते. या कुप्या अनेक लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून वापरल्या जातात. याशिवाय Syringes, Ampouls and cartridges आदी गोष्टींची निर्मिती करते. या कंपनीच्या उत्पादनांचा एक दर्जा असून त्याचा वापर अनेक औषध कंपन्यांकडून करण्यात येतो. भविष्यात या लस पुरवठ्यासाठी लागणाऱ्या या गोष्टींची तुटवडा निर्माण होवू नये यासाठी या कंपनीचे ५० टक्के समभाग खरेदी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या कंपनीचे ५० टक्के समभाग प्रसिधअद उद्योगपती शापूर मिस्त्री यांच्याकडे होते. त्यांच्याकडून हे ५० टक्के समभाग खरेदी करण्यात आल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली.

SCHOTT AG Kaisha या कंपनीचे समभाग खरेदी केल्यामुळे लसीचा डोस भरण्यासाठी लागणाऱ्या व्हावलचा तुटवडा होणार नाही. तसेच लसीचा सुरक्षित पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. सद्यपरिस्थितीत या कंपनीची देशात ६०० कोटींची गुंतवणूक असून भविष्यकाळात सीरम आणि SCHOTT AG Kaisha यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील गुंतवणूक आणखी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये माहिती दिली.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *