Breaking News

प्रकाश आंबेडकर वंचितपासून तीन महिने राहणार दूर आघाडीची सारी सुत्रे आता रेखा ठाकूर यांच्याकडे

मुंबई: प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर हे पक्षापासून तीन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिने ते वंचितच्या कोणत्याही दैंनदिन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील कालावधींकरीता रेखा ठाकूर यांच्या हाती सारी सुत्रे हस्तांतरीत केले. तसेच आगामी ५ जिल्ह्यातील पोट निवडणूका पूर्ण ताकदीनीशी लढण्यासाठी रेखा ठाकूर यांना मदत करण्याचे आवाहन अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून आज केले.  त्याचबरोबर स्वत:च्या वैयक्तिक कारणामुळे आपण तीन महिन्यासाठी दूर रहात असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

रेखा ठाकूर यांनी या अनुषंगाने एक निवेदन प्रसिध्दीस दिले असून बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून उद्या सकाळी ११ वाजता माध्यमांना हेल्थ बुलेटिन देण्यात येईल. बाळासाहेबांच्या नेतृत्वात राज्यभर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात आली असून पक्ष सध्या ५ जिल्ह्यात होऊ घातलेल्या पोट निवडणूका पूर्ण ताकदीनिशी लढत असून बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः सक्षम उमेदवारांची निवड केलेली आहे.

बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सर्व आंदोलनांना यशस्वीपणे सुरू ठेवले जाईल. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, पदोन्नती मधील आरक्षणाचा प्रश्न तसेच मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षण या सर्व आंदोलनांना सुरू ठेवण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या नावाखाली सरकारकडून सुरू असलेला भोंगळ कारभार वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी उघड केला असून जनतेच्या रोजगाराचे आणि आरोग्याचे प्रश्न भीषण बनत चालले आहेत. त्या विरोधात पक्ष सक्षमपणे आवाज उठवत राहील.

 

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *