Breaking News

पंतप्रधान मोदींनाच आम्ही भीती दाखविणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी
देशात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ लाख रूपये देण्यावरून जसे खोटे बोलले तसे ते आता याप्रश्नीही खोटे बोलत आहेत. या विधेयकावरून पंतप्रधान मोदी हे जनतेला भीती दाखवित आहेत. मात्र आता आम्ही त्यांना भीती दाखविणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
केंद्र सरकारच्या नागरीकत्वाशी संबधित सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित आघाडीकडून आज दादर टीटी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरी आघाडीकडून दादर टीटी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दोन लाखजण मावतील इतकं मोठ डिटेशन सेंटर बांधल जात असून तिथे जायच नसेल तर मोदी सरकार पाडा असे आवाहन करत हिंमत असेल, तर मला अटक करा असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले.
अनेक जणांकडे रहिवासी पुरावे नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार ४० टक्के हिंदू विरोधात असून त्यांच्याकडे कागदपत्रेच नाहीत. मग अशांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठविल जाणार आहे. त्यामुळे डिटेंशन सेंटर (छावणी केंद्र) उभारल्यास तोडून टाकू असा इशारा देत कायद्याला संघर्षाने उत्तर द्यावं लागतंय अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचा कट देशात अराजकता माजविण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

रोहिणी खडसे-खेवलकर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णालयात दाखल झाल्याची ट्विटरवरून माहिती

मुक्ताईनगर-मुंबई : प्रतिनिधी भाजपामध्ये होत असलेल्या घुसमटी आणि अन्यायामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *