Breaking News

आसामी चित्रपटासृष्टीकडे वळली प्रियांका भोगा खिरकी चित्रपटाची निर्मिती करणार

मुंबई : प्रतिनिधी

बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत आपल्या अभिनयाची भूरळ घालणाऱ्या प्रियांकाने प्रादेषिक चित्रपट निर्मितीत सक्रिय होऊन इतरांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत प्रियांकाच्या आई डॅा. मधु चोप्रा यांनी निर्माण केलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातल्यानंतर आता या चित्रपटाचा गुजराती रिमेकही होत असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच आपल्याला दिली आहे. आता मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटापाठोपाठ प्रियांका आसामी भाषेतील चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती चित्रपट क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

मराठीसोबतच भोजपुरी, सिक्कीमी, पंजाबीमध्ये यशस्वी चित्रपटनिर्मिती केल्यानंतर प्रियांका आता आसामी चित्रपटसृष्टीकडे वळली आहे. ‘भोगा खिरकी’ (ब्रोकन विंडो) असं शीर्षक असलेल्या या आसामी चित्रपटाचं दिग्दर्शन पद्म भूषण पुरस्कार विजेते दिग्दर्शक जानू बरुआ करणार असल्याने या चित्रपटाला एका वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. या चित्रपटाची कथा एका स्त्रीवर आधारित आहे. या स्त्रीच्या जीवन प्रवासात आलेल्या तीन व्यक्तींमधील वैचारिक आणि अस्तित्वाच्या संघर्षामुळे जीवनात झालेल्या बदलांची गाथा सांगणारी असल्याचं समजतं. थोडक्यात सांगायचं तर मुख्य भूमिकेत असलेली स्त्री, तिचे वडील, पती आणि एका अनोळखी व्यक्तीची ही कथा आहे. आजवर कधीही समोर न आलेल्या उत्तर-पूर्वेकडील एका महत्त्वपूर्ण विषयावरील हा चित्रपट असेल. या निमित्ताने उत्तर-पुर्वेकडील राज्यांमधील संस्कृतीचं दर्शनही प्रेक्षकांना घडेल. पर्पल पेबल पिक्चर्स आणि जानू बरुआ प्रथमच एकत्र आल्याने या चित्रपटात काय वेगळं पाहायला मिळतं आणि हा चित्रपट हिंदीत डब करून प्रदर्शित केला जाणार का ते पाहायचं आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *