Breaking News

परदेशी प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केले “हे” नवे नियम चाचणी निगेटीव्ह आल्यास दोन वेळा व्हावे लागणार क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण काल डोंबिवलीत आढळून आल्यानंतर राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी नवे नियम जारी केले असून ते अंत्यत कडक स्वरूपाचे आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर निगेटीव्ह आली तरी दोन वेळा क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्याचा नियम आज नव्याने लागू करण्यात आला असून त्या विषयीचा आदेश आज जारी करण्यात आला.

राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार दक्षिण आफ्रिका, बोस्तवाना आणि झिम्बाब्वे या तीन देशांना हाय रिस्क देश म्हणून जाहीर केले आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांही हाय रिस्क रूग्ण म्हणून यापुढे मानण्यात येणार असून या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर स्वतंत्र डेस्क तयार करण्यात येणार आहे. या प्रवाशांनी या डेस्कवर जावून तेथे आपली माहिती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मागील १५ दिवसात कोठे कोठे  प्रवास केला त्याची माहितीही देणे आता परदेशी प्रवाशांना बंधनकारक करण्यात आले आहे.

या हाय रिस्क देशातून प्रवास केलेल्या प्रवाशांना प्रसंगी विमानातून उतरविण्यात येईल असा इशाराही देण्यात आला असून मुंबईत विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी सर्वात आधी आरपीटीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले असून त्यानंतर पुन्हा ७ दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. या सात दिवसानंतर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करणे करावी लागणार आहे. ही चाचणीही निगेटीव्ह आल्यास पुन्हा एकदा ७ दिवस प्रवाशास क्वारंटाईन रहावे लागणार आहे. दोनवेळा चाचणी आणि दोन वेळा क्वारंटाईनमध्ये राहणे या हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

या परदेशी प्रवाशांनी आपल्या प्रवासाची खरी माहिती देणे बंधनकारक असून एखाद्याने खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास खोटी माहिती देणाऱ्यावर आपतकालीन कायद्याखाली कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर देशांतर्गंत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे एक तर दोन्ही लसीचे डोस घेतलेले असणे आवश्यक आहे किंवा त्याने ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह असणे गरजेचे करण्यात आले आहे.

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे:-

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *