Breaking News

अजित पवार गैरहजर, शरद पवारांनी सांगितले हे कारण… कर्मचाऱ्यांना कोरोना तर अजित पवारांना कोरोनाची लक्षणे

बारामती : प्रतिनिधी

मागील वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी दिवाळी सणाच्या पाडव्याला बारामतीतील गोविंद बागेतील आपल्या घरी शरद पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय हजर राहून दिवाळी साजरी करतात. तसेच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांनाही शुभेच्छा देतात. मात्र यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे आजच्या दिवशी हजर राहीले नाहीत. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले अखेर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याबाबत खुलासा करून त्यावर पडदा टाकला.

अजित पवार यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांनाही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरी थांबणेच पसंत केल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरीकांनी सणा-सुदीतही मास्कचा वापर करावा आणि कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मात्र आज गोविंद बागेतील दिवाळी सणानिमित्त स्वत: शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी तथा खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सकाळ ग्रुपचे प्रतापराव पवार यांच्यासह इतर कुटुंबिय हजर होते.

दरवर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबिय हजर राहतात. यावेळी सर्वजण मिळून दिवाळी सण साजरा करतात. त्याचबरोबर पाडव्याच्या दिवशी राज्यातील कार्यकर्त्येही पवार कुटुंबियांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गोविंद बागेत येतात. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांनाही पवार कुटुंबियांकडून शुभेच्छा दिल्या जातात. यंदा मात्र पहिल्यांदाच अजित पवारांच्या गैरहजेरीत गोविंद बागेत पवार कुटुंबियांची दिवाळी साजरी होत आहे.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *