Breaking News

गृह राज्यमंत्री आणि नोडल अधिकाऱ्याच्या आदेशानंतर अखेर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल कॉ.सुबोध मोरे, शैलेंद्र कांबळे यांच्या प्रयत्नाला यश

मुंबई : प्रतिनिधी

मागासवर्गीय आकाश जाधव या २२ वर्षाच्या दलित तरुणाला हनुमान टेकडी, सांताक्रूझ पूर्व येथे जातियवादी गुंडानी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा ४डिसेंबर २० रोजी कुपर रुग्णालयात अकाली मृत्यू झाल्यानंतर सदर जातीयवादी गुंडवक अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडीत कुटुंबियांबरोबर, सामाजिक कार्यकर्त्ये कॉ.सुबोध मोरे आणि शैलेद्र कांबळे यांनी केली. त्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांच्याकडे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे यांची भेट घेतली. त्यावर या दोन्ही वरिष्ठांनी सदर गुडांच्या विरोधात अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार अखेर पोलिसांनी या कायद्याखाली सदर गुंडाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या कायद्यानुसार राज्य सरकारने या मागण्याची दखल घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

‌अॅट्रासिटी अॅक्ट मधील तरतुदीनुसार तातडीने पिडीत कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी.

‌पिडीत कुटुंबियांपैकी एका मुलीला शासकीय सेवेत नोकरी द्यावी.

‌पिडीत कुटुंबियांना व साक्षिदारांना आरोपीं कडून जीवाला धोका असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार पोलिस संरक्षण देण्यात यावे.

‌सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा.

‌सदर खटला चालवण्यासाठी पिडित कुटुंबियांतर्फे वरिष्ठ सरकारी अभिव्यक्ता(वकील) म्हणून अॅड.बी.जी.बनसोडे यांची नेमणूक शासनाने करावी.

‌वरील मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरीत करावी म्हणून जातीअंत संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अन्य सामाजिक, आंबेडकरी संघटनाना घेऊन एक शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती जातीअंत संघर्ष समितीचे नेते कॉ.शैलेंद्र कांबळे व कॉ. सुबोध मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

 

Check Also

नवउद्योजकांसाठी डिक्कीने उभारले सुविधा केंद्र चेंबूरमध्ये उभारले कार्यालय

मुंबई : प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ॲाफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई विभागातर्फे उद्योग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *