Breaking News

या ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या आयटी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव चंद्रा रस्तोगी यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

त्याचबरोबर डॉ.एच.मोडक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ.संदिप राठोड यांची हाफकिन बायो-फार्मा कार्पोरेशनच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी राजेश देशमुख हे होते.

एस.एल अहिरे यांची महिला व बाल कल्याण विभागाच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

अनिल भंडारी यांची अकोल्यातील एम.एस.सीड्स कार्पोरेशनवरून सेल्स टॅक्स विभागाच्या सह आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.

सुशील खोडवेकर यांची शालेय व क्रिडा विभागाच्या उपसचिव पदावरून कृषी व पदुम विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

तर बी.बी.दांगडे यांची रायगडच्या जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष पदावरून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

 

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *