Breaking News

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार- क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्य सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात काही ज्येष्ठ सिने आणि टि.व्ही. मालिकांमधील कलावंतांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ही बंदी अवैध असल्याचा निकाल दिला. त्यानंतर राज्य सरकारने या कलावंतांच्या हजेरीला आज परवानगी दिली.

कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता;  मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक ३० मे २०२० व  २३ जून २०२० अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, ६५ वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *