Breaking News

या चार सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या ओ.पी. गुप्ता नवे उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव

मुंबई : प्रतिनिधी

दिवाळी झाल्यानंतर लगेच राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या रिक्त प्रधान सचिव पदी ओ.पी.गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांच्यासह आणखी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अरविंद कुमार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर.

अश्विनी कुमार व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव व विशेष कार्य अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई या पदावर.

श्रीमती सीमा व्यास, सचिव महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग मुंबई यांची नियुक्ती प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी १ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर.

Check Also

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …

One comment

  1. Very important news and helpful

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *